हिवरखेड पूर्णा नदी पात्रात आढळला महिलेचा मृतदेह, परिसरात खळबळ
सिंदखेड राजा( प्रतिनिधी सचिन मांटे दि.४.डिसेंबर ). सिंदखेडराजा तालुक्यातील हिवरखेड पूर्णा, येथे तानाबाई बळीराम सोरमारे,(वय ५५) मु,पो.मंडप गाव, तालुका देऊळगाव राजा,जि.बुलढाणा. येथील रहिवासी असून हिवरखेड पूर्णा येथे आपल्या माहेरी भावाकडे आल्या होत्या,अशी प्राथमिक माहिती कळते त्यांच्यावर सेंट्रल बँकेचे कर्ज होते,हिवरखेड पूर्णा येथील नदीपात्रात मृतदेह आढळल्यामुळे परिसरात खळबळ उडाली याबाबत पोलीस पाटील यांनी पोलीस स्टेशन किनगाव राजा माहिती दिली यानंतर पोलीस घटना ठिकाणी पोहोचले,मयत महिलेचे प्रेत हे कुजलेल्या अवस्थेत आढळले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिंगणे यांनी पोस्टमार्टम केल्यानंतर महिलेचा मृत्यू हा पाण्यात बुडून झालेला आहे.असे फिर्यादीच्या(दत्तु बळीराम सोरमारे. वय. ३६ )तोंडी रिपोर्ट वरून सदरचा मर्ग दाखल करून पुढील तपास ठाणेदार रबडे यांच्या मार्गदर्शनाखाली नापोकॉ. राजू दराडे यांच्याकडे देण्यात आला आहे.