किनगावराजा दि.१३(प्रतिनिधी) सहकार महर्षी स्व.भास्करराव शिंगणे साहेबांच्या पावलावर पाऊल टाकत गत ३० वर्षांपासून जातीपातीचे राजकारण न करता फक्त विकासाचे राजकारण केले म्हणूनच जनतेने ५ वेळेस आमदार म्हणून निवडून दिल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी केले.किनगावराजा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
मध्यंतरीच्या काळात ५ वर्षाचा ब्रेक घेतल्यामुळे या भागात स्वयंघोषित जलपुरुष,विकासपुरुष,महापुरुष निर्माण झाले होते.त्यांनी विकासकामांचे मृगजळ उभे करून कुदळ, गुलालाचे पोते,नारळाचे पोते अन ढोलताशे गाडीत सोबत घेऊन फिरतांना उद्घाटनाचा नुसता सपाटा चालवला होता परंतु सिंदखेडराजा मतदार संघातील सुजान जनतेने अशा स्वयंघोषित महापुरुषांना त्यांची जागा दाखवीत पराभूत केले व परत जनतेची सेवा करण्याची संधी दिली याबद्दल आभार व्यक्त केले.
मेळाव्यात मार्गदर्शन करतांना ना.शिंगणे यांनी भाजपचाही खरपूस घेतांना राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांना भडकविण्याचे कार्य भाजपने बंद करावे.कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडी सरकार सक्षम असल्याचेही त्यांनी भाजपाला सुनावले.दरम्यान येथील शीवसैनिक पवन कुलकर्णी,जनार्धन हरकळ,तसेच प्रा.अविनाश राजे,रमेश वगदे,प्रशांत काकडे,संजय मांटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ऍड.नाझेर काझी होते तर विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष गजानन पवार,जी.प.सदस्य राम जाधव,पंडितराव खंदारे,गजानन बंगाळे,तालुकाध्यक्ष शिवाजीराजे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक सुरेश तुपकर,खरेदी विक्री संघाचे मुख्य प्रशासक रमेशराव खरात,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आत्माराम कायंदे,नाथा दराडे,विनायक राठोड,कमलसेठ तापडिया आदी
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस इरफान अली, तेजराव देशमुख,अशोकराव जाधव,मधुकर गव्हाड,गौण खनिज संपत्ती समितीचे जिल्हा सदस्य संदीप देशमुख,सतीश काळे,युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभयसिंह राजे,सुनील जगताप,सतीश काळे,प्रभाकर देशमुख,जगणराव सहाणे,राम राठोड,नारायण किंगरे,मनोहर गव्हाड,कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक निलकंठ जाधव,पांडुरंग सोळंके,प्रकाश राठोड,आर.आर.पाटील,ऍड.संदीप मेहेत्रे,अरविंद खांडेभराड,आदी मान्यवरांची उपस्थिती होती.कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक विजयसिंह राजे,युवा कार्यकर्ते विनोद हरकळ,अजय राजे,नवाज पठाण,सचिन मांटे,आनंद राजे,गणेश रमेश काकड,गजानन साठे,सुनील झोरे,असिफ कुरेशी,अल्ताफ कुरेशी आदींनी मेळाव्याचे नियोजन केले होते.कार्यक्रर्माचे प्रास्ताविक प्रा.अविनाश राजे,सूत्रसंचालन विष्णू मांटे,यांनी केले.
Related Posts