
किनगावराजा ( सचिन मांट्ये ) – .किनगावराजा हद्दीत चोरटयांनी विदेशी दारूचे फोडले .किनगावराजा येते प्रतिक वाईन बार व रेस्टॉरंट मालकीण सौ, प्रयाग ज्ञानेश्वर चाटे यांनी पोलीस स्टेशन किनगावराजा येथे तोंडी तक्रारनुसार अज्ञात आरोपीने किनगावराजा येथील प्रतीक वाइन बार रेस्टॉरंट चोरटयांनी दि.२३ मे ला ६:३० वाजता बार व रेस्टॉरंट अज्ञात चोरटयांनी फोडले व दुकानात विविध कंपनीच्या विदेशी दारूचा माल अंदाजे,६८४७८३/-रुपयेचा माल चोरटयांनी लंपास केला चोरीसाठी चोरटयांनी टाटा मॅजिक या वाहन क्रमांक. एम.यच २८.यच ८९९४. वापर केला होता.या चोरीचा लवकरात लवकर छडा लावून चोरट्याच्या मुसक्या आवळल्या जातील किनगावराजा पोलीस स्टेशन कडून कळविण्यात आले. तसेच सदर घटनाचा तपास किनगावराजा पोलीस स्टेशन चे ठाणेदार सोमनाथ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमदार राजू दराडे,जाकीर पठाण,रोशन परसूवाले,गजानन सानप,हे करत आहे.