लोणार : नुकतच लंडन येथील चेवनिंग नावाची ४५ लाखाच्या स्कॉलरशिप ला पिंपरी खंदारे येथील राजू केंद्र पात्र ठरले आहेत. अत्यंत हालाखीची परिस्थिती आणि या परिस्थितीला सामोरे जात त्यांनी हे यश संपादन केले. वयाच्या २१ व्या वर्षी तरुण मित्रांना सोबत घेत त्यांनी ग्रामपंचायत लढवली पण त्यांना त्यात अपयश आलं. अपयशाची ही पहिली पायरी चढत त्यांनी एवढं मोठ हे यश संपादन केलं. त्यांच्या सोबत भरपूर विषयावर चर्चा करण्यात आली. ग्रामीण भागातील शेतकरी वर्गातील या मुलांन मिळवलेल्या या यशा बद्दल संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचं कौतुक केलं जातं आहे. लोणार वासियांसाठी ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे.
हा सत्कार करत असतांना पालकमंत्री राजेंद्र शिंगणे साहेब, जिल्हाअध्यक्ष नाझेर काझी साहेब, जिल्हा उपाध्यक्ष किशोर भाऊ मापारी, विक्रांत भाऊ मापारी, विधानसभा अध्यक्ष पुरुषोत्तम भाऊ पाटील, तालुका अध्यक्ष सदानंद पाटील तेजनकर, जिल्हा परिषद सदस्य राजू भाऊ इंगळे, डॉ. भास्कर भाऊ मापारी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सचिव समाधान पाटील पोफळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सत्कार करण्यात आला. या वेळी तालुका अध्यक्ष सदानंद पाटील तेजनकर, माजी सभापती डॉ.केंद्रे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष भाऊ बनकर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष जीवन घायाळ पाटील, गजानन डव्हाळे, दीपक डव्हाळे, विशाल बोरकर, शुभम खंड,सूरज साठे,धनंजय भोकरे,अमर भोकरे, पवन राजधन व गावकरी मंडळी उपस्थित होते.