कृषी विज्ञान केंद्र,बुलढाणा येथे स्व वसंतराव नाईक यांची जयंती साजरी
![](https://www.matrutirthalive.com/wp-content/uploads/2021/07/WhatsApp-Image-2021-07-03-at-21.17.07-1024x669.jpeg)
बुलढाणा — स्व वसंतराव नाईक जयंती निमित्त डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व विद्यापीठ संचालनायाद्वारे आयोजीत कृषी दिनाच्या कार्यक्रमात विदर्भातील शेतकरी यांना सन्मानीत करण्यात आले.कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा येथे जिल्ह्यातील कृषी पुरस्कार प्राप्त शेतकर्याचा सन्मान कृषी विद्यापीठाचे कार्यकारी परीषद सदस्य तथा स्वाभिमानीचे विनायक सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आला.सदरचा कार्यक्रम हा आॅनलाईन आणि प्रत्यक्ष कार्यक्रमात विविध पुरस्कार प्राप्त शेतकरी यांचा गौरव करण्यात आला आहे.यावेळी अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.बच्चुभाऊ कडु,आमदार गोपीकीशन बाजोरीया,आमदार अमोल मिटकरी,कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ विलास भाले,कार्यकारी परीषद सदस्य गणेश कंडारकर,मोरेश्वर वानखेडे,अर्चना बारब्दे,यांच्यासह इतर मान्यवर उपस्थीत होते.
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा हरीतक्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्रातील अनेक नाविन्यपुर्ण योजनांचे संकल्पक स्व वसंतरावजी नाईक यांचा जन्मदिवस डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाव्दारे’कृषी दिन’ म्हणुन दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो परंतु कोविड १९चा प्रादुर्भाव लक्षात घेता सदरचा कार्यक्रम आॅनलाइन आणि प्रत्यक्ष सहभागे कृषी विद्यापीठ व विद्यापीठ शिक्षण संचालनायाव्दारे आयोजीत करण्यात आला होता.सदरच्या कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाव्दारे सन २०१८-२०१९ या वर्षात कृषी भुषण,उद्याण पंडीत,स्व वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी,डॉ पंजाबराव देशमुख कृषी रत्न,असे विविध पुरस्कार प्राप्त एकुण २६ शेतकर्याचा सन्मान प्रत्यक्ष उपस्थीत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला आहे.बुलढाणा येथील कृषी विज्ञान केंद्र येथे कृषी विद्यापीठाचे कार्यकारी परीषद सदस्य तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक,कृषी विज्ञान केंद्राचे समन्वयक सि.पी.जायभाये यांची उपस्थीती होती.सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते स्व वसंतरावजी नाईक व भाऊसाहेब उपाख्य डॉ पंजाबराव देशमुख यांना अभिवादन करण्यात आले तसेच महाराष्ट्र शासनाव्दारे सन्मानीत बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील कृषी भुषण पुरस्कार प्राप्त व स्व वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकरी महिला अनिता ताई रामसिंग पवार,रामसिंगजी पवार,तसेच इतर प्रगतीशील शेतकर्याचा सन्मान सरनाईक यांच्या हस्ते शाल,श्रीफळप्रमाणपत्र,व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला आहे.त्याचप्रमाणे पत्रकारीतेत केलेल्या उल्लेखनीय कामगीरीसाठी शासनाने पुरस्कार जाहिर केलेल्या पत्रकारांचा देखील सन्मान अकोला येथे कृषी विद्यापीठात करण्यात आला.यावेळी बुलढाणा येथे कृषी विज्ञान केंद्राचे सि.पी.जायभाये,डॉ अनिल तारु,डॉ रोहित चव्हाण यांच्यासह इतर अधिकारी व शेतकरी उपस्थीत होते.