गजानन सोनटक्के जळगांव जा.प्रतिनिधी. – जळगाव जामोद तालुक्यातील जामोद सूनगाव सर्कलमधील नियमित कर्जदार हे नियमित घेतलेल्या कर्जाचा भरणा करीत असतात तसेच या शेतकऱ्यांनी याआधी घेतलेल्या कर्जाचा भरणा केलेला असून शासनाने महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना 2019 जाहीर करीत असताना नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये एवढी प्रोत्साहनपर रक्कम थेट देण्याचे जाहीर केले होते ये ती मदत अद्याप पर्यंत शेतकऱ्यांना मिळालेली नसुन ती रक्कम आता शेतकऱ्यांना खते आणि बियाणे करीता उपयोगात येईल याकरिता शासनाने लवकरात लवकर 50 हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम शेतकऱ्यांना देऊन त्या शेतकऱ्यांचे मनोगत वाढेल व थकीत कर्जदार शेतकरी कमी होऊन बँकांचा एनपीए स्थिर राहण्यास मदत होईल लॉक डाऊन बाजारपेठा बंद असल्यामुळे शेतकऱ्याचा माल हा घरातच पडून असल्याने शेतकऱ्यांना बी बियाणे व खतासाठी पैशाची जुळवा जुळव करीत आहे व त्यामध्ये बँका शेतकर्यांना कर्ज भरा असे वारंवार सांगत आहे तरी सरकारने नियमित कर्जदार यांना दिलेला शब्द पाळावा असे जळगाव जामोद तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये बोलले जात आहे
Related Posts