गजानन सोनटक्के जळगाव जा – गेली एक ते दीड महिना झाले जळगाव जामोद तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे… तरीसुद्धा अनेक शेतकऱ्यांना बँकांकडून पिक कर्ज मिळत नाही आहे.त्यात जळगाव जामोद तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट उभे राहिलेले आहे.कुठेतरी शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळाला पाहिजे याकरता शेतकरी हा बँकांचे उंबरठे जी झीजवतो परंतु अधिकाऱ्यांच्या मनमानी मुळे /चुकीच्या कार्यपद्धतीमुळे अनेक शेतकऱ्यांना आतापर्यंत सुद्धा ती कर्ज मिळाले नाही.
तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी मागील कर्ज निल व्हावे आणि नवीन बँकांचे व्यवहार चालू व्हावे याकरता खूप शेतकऱ्यांनी वन टाइम सेटलमेंट मध्ये पिक कर्ज भरली.परंतु अशाही काही शेतकऱ्यांना आतापर्यंत पिक कर्ज मिळाले नाही कुठेतरी ही सर्व पीक कर्जाची प्रकरणे निकाली काढून तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना न्याय द्यावा या मागणी करता आज युवा सेना जिल्हा समन्वयक ईश्वर वाघ, युवानेते अक्षयभाऊ पाटील , अल्पसंख्यांक शहर प्रमुख चांद कुरेशी, उपशहरप्रमुख मंगेश कतोरे, दिपक बावस्कर, गोपाल ढगे, सतीष हुरसाळ, विनोद पाटील तसेच बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.