बुलडाणा दि.22 : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत बांधकाम कामगारांची मंडळात नोंदणी करून त्यांना विविध कल्याणकारी विविध योजनांचा लाभ देण्यात येतो. लगतच्या 12 महिन्यात बांधकाम मजूर म्हणून किमान 90 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस काम केलेल्या बांधकाम कामगारांची मंडळात नोंदणी करण्यात येवून विविध कल्याणकारी योजनांचा लाभ डीबीटी पध्दतीने खात्यात जमा करण्यात येतो.
तसेच जिल्ह्यातील सर्व बांधकाम कामगारांना इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत बांधकाम कामगारांना नोंदणी व नुतणीकरणाची पावती व स्मार्ट कार्ड प्राप्त करण्याकरिता कार्यालयाद्वारे एसएमएस अथवा फोन द्वारे कळविण्यात येणार आहे. नंतर कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून आपले स्मार्ट कार्ड अथवा नुतणीकरण पावती प्राप्त करुन घ्यावी, कोविड -19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता विनाकारण कार्यालयात कामगारांनी गर्दी करु नये. तसेच सोमवार रोजी कार्यालयात बांधकाम कामगारांची गर्दीमुळे सर्व कामगारांचे कामकाज करणे शक्य नाही. यामुळे विविध ठिकाणाहून आलेल्या कामगारांना आर्थिक, मानसिक होणारा नाहक त्रास टाळण्याकरीता कार्यालयाद्वारे एसएमएस अथवा फोनद्वारे कळविल्या शिवाय पावती अथवा स्मार्ट कार्ड घेण्याकरीता येवू नये.
तालुकानिहाय कार्यालयात येवून स्मार्ट कार्ड अथवा पावती प्राप्त करण्याची कार्यपध्दतीत वरील प्रमाणे बदल करण्यात आलेला आहे. याची सर्व बांधकाम कामगारांनी नोंद घ्यावी, असे सरकारी कामगार अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.