मातृतीर्थ लाइव्ह वृत्त – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वकांक्षी असलेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणावर तक्रारी दाखल झाल्या होत्या. या अनुषंगाने ठाकरे सरकारने माजी सनदी अधिकारी विजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती. या समितीने राज्य सरकारला अहवाल सादर केला. माजी सनदी अधिकारी विजय कुमार यांच्या समीतीने राज्य सरकारला सादर केलेला अहवाल एबीपी माझाच्या हाती लागला आहे.

जलयुक्त शिवार योजनेची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारची धडक कारवाई केली. जलयुक्त शिवाराच्या 1173 कामांच्या चौकशीसाठी अँटी करप्शन विभागाकडे चौकशीसाठी वर्ग केली आहे. कॅगच्या अहवालातील 924 कामे आणि तक्रारींपैकी 249 कामे अशी एकूण 1173 कामांची अँटी करप्शनच्या माध्यमातून चौकशी होणार आहे. तर उर्वरित 6 लाख 31 हजार कामांची पूर्णपणे चौकशी होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यामातून या कामांची चौकशी केली जाणार आहे.
समितीने ठरवून दिलेल्या नियमावलीनुसार जिल्हाधिकारी या कामांची चौकशी करणार आहेत. ज्या कामांमध्ये शासनाचे नुकसान झाले आहे ती काम अँटी करप्शनकडे चौकशीसाठी वर्ग केली जाणार आहेत. त्यामुळे राज्यभरात झालेल्या 6 लाख 33 हजार जलयुक्त शिवार कामांची पूर्णपणे चौकशी होणार आहे.