रवींद्र सुरुशे मो.९६७३०४९३४२ मेहकर : (बुलढाणा) : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या 37 व्या दीक्षांत समारंभ नुकताच आभासी पद्धतीने थाटात पार पडला.दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानी महामहीम राज्यपाल भगत सिंह कोश्यारी , प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितिन गडकरी, प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत तसेच कुलगुरू मुरलीधर चांदेकर,व प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर इतर मान्यवर उपस्थित होते.
राज्यपाल तसेच कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना पदके पारितोषिके जाहीर केली या दीक्षांत समारंभात देऊळगाव माळी तालुका मेहकर येथील अनुराधा कॉलेज ऑफ फार्मसी चिखली या विद्यालयातील कुमारी जयश्री भगवान मानवतकर(राऊत)यांना भेषजी स्नातक परिक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल विश्वनाथ शिवराम करमकर सुवर्णपदक व प्रथम स्थान प्राप्त केल्याबद्दल श्रीमान राम सिंह जगत सिंह शेखावत सुवर्णपदक असे दोन सुवर्णपदकाणे पुरस्कृत करण्यात आले. असून विद्यालयाचे प्राचार्य,शिक्षक वृंद,यांनी तिचे अभिनंदन केले. त्यांच्या या यशाबद्दल जिल्हाभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.