गजानन सोनटक्के जळगाव जा – जळगांव जामोद शहरात प्रभाग क्रमांक 5 येथील काही महिलांनी घनकचरा उचलणाऱ्या ट्रॅक्टर वरील माणसांना घरा समोरील नालीतील कचरा उचलण्यासाठी सांगितले असता.हे आमचे काम नाही असे सांगितले. नगर पालिकेचे ट्रॅक्टर जर त्या रोड वरून जात आहे तरी पण कचरा उचलल्या जात नाही.आरोग्य निरीक्षक चांडाले यांना बोलावले असता कचरा उचलण्यात मागे पुढे होत असते असे बेजबाबदार उत्तर दिले. तसेच मी आज सुट्टीवर आहे तरी आलो अशी उपकाराची भाषा केली. गावातील कचरा उचलून घेण्याची जवाबदारी जर आरोग्य निरीक्षका ची नाही तर मग कोणाची आहे.
सदर प्रकार हा अतिशय गंभीर असून समंदीत आधिकारी व कंत्राटदार यांच्यावर मुख्याधिकारी यांनी त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिक करत आहे.
Related Posts