जालना – ऍट्रसिटीच्या एका गुन्ह्या मध्ये मदत करण्यासाठी 2 लाख रुपयांची लाच स्वीकारताना जालण्याचे डीवायएसपि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या सह दोन पोलीस कर्मचाऱ्यांना २० मे रोजी दुपारी पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.सदर लाचेच्या मागणीची पडताळणी केल्या नंतर सापळा रचून पोलीस कर्मचारी संतोष अंभोरे यास तक्रारदार यांच्याकडून 2 लाखाची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडून उपविभागीय पोलीस अधिकारी खिरडकर यांच्यासह विठ्ठल खार्डे,संतोष अंभोरे यांच्या विरुद्ध कारवाई केली. या कारवाईमुळे पोलीस अधिकारी व कर्मचारी मद्ये मोठी खळबळ उडाली आहे.
लाचखोरी प्रकरणात आरोपींना सोमवार पर्यंत न्यायालयीन कोठडी प्रस्तुत प्रकरणात फिर्यादी तर्फे ॲड.रोहित बनवसकर,
ॲड.अनिरुद्ध घुले पाटील,ॲड.रमेश गाढे,ॲड.दीपाली भालशंकर,ॲड.सलमान खान,ॲड.शुभम भारुका,ॲड.शेखर पाटील,ॲड.बाळासाहेब डाके आदींनी कामकाज बघितले.