महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा नागपूर विभागाच्या सर्व आघाडी अध्यक्ष / सचिव पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न.
शब्दांकन-नरेंद्र चौधरी. प्रसिध्दी करिता-दिलीप चौधरी (प्रांतिक प्रसिध्दी प्रमुख)

नागपूर – महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा नागपूर विभागाच्या सर्व आघाडी अध्यक्ष / सचिव पदाधिकाऱ्यांची दि .१८ मे रोजी रात्री ९ वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या सुरूवातीला कै. रामुजी वानखेडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. बैठकीचे अध्यक्षस्थान प्रदेश कार्याध्यक्ष अशोक काका व्यवहारे यांनी भूषवावे अशी सूचना डॉ. भूषण कर्डिले यांनी मांडली. तर प्रदेश सहसचिव बळवंतराव मोरघडे यांनी अनुमोदन दिले. प्रदेश कोषाध्यक्ष गजाजन नाना शेलार , प्रदेश महासचिव डॉ . भूषण कर्डिले या मान्यवरांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनात पार पडली . रात्री ९ वाजता झूम द्वारे ऑनलाईन नागपूर विभागातील महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा जेष्ठ , सेवा , युवा व महिला अध्यक्ष / सचिव यांनी केलेल्या नियुक्त्या व त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेण्यात आला .
यावेळी अशोक काका व्यवहारे म्हणाले की , विदर्भात तेली समाजाची संख्या जास्त असल्याने समाजाला त्यामुळे मान सन्मान मिळतो . आजच्या बैठकीत अध्यक्ष / सचिव यांनी मांडलेले विचार अतिशय स्तुत्य असून मी त्यांचे अभिनंदन करतो . तर प्रदेश कोषाध्यक्ष गजानन नाना शेलार म्हणाले की , बैठक अतिशय चांगल्या पध्दतीने झाली . कोरोना काळात प्रत्येकाला समाज संघटनेच्या माध्यमातून मदत केली पाहिजे . युवकांनी नुसत्या नियुक्त्या न करता लवकरच सुरु होणाऱ्या बेरोजगार सेल मार्फत रोजगार व नोकरी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे . तेली समाजाचा आत्मा विदर्भ आहे . त्यामुळे घरोघरी जावून समाज जोडो अभियान राबवावे तसेच मोठ्या शहरात विभागावार नियुक्त्या व्हाव्यात , विविध आघाड्या या सक्रीय असाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली तर नाशिक येथे कोरोनामुळे स्थगित झालेला समाज मेळावा भविष्यात कोरोना संकट गेल्यावर निश्चित होईल. तसेच एखाद्या व्यक्ती संघटनेतून निघून गेला व विरोधी काम करणाऱ्या व्यक्तीचे सतत नाव घेवून त्यास मोठे करु नये .
प्रदेश महासचिव डॉ . भूषण कर्डिले म्हणाले की , आजची बैठक आपल्या भावना समजून घेण्यासाठी होती आपणही आपली मते सचोटीने मांडली . येत्या काळात दिशा ठरवून युवा / महिला / सेवा आघाडी आणखी चांगले काम करण्यासाठी सक्रीय असावे . आपल्या मतांचा नेहमीच आदर केला जाईल , अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली .
बैठक सुमारे दोन तास चालली . बैठकीस मोठ्या संख्येने विविध आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते . बैठकीचे सुत्रसंचलन नागपूर विभागीय अध्यक्ष रविंद्र येनूरकर यांनी केले . यावेळी येनुरकर यांनी विदर्भातील संघटनेचा आढावा सादर करत नियुक्तयां सदर्भात काही महत्वपूर्ण सुचना केल्या . यावर गजानन नाना शेलार म्हणाले, वास्तव असेल तर त्याचे स्वागत केले जाईल . त्यात सुधारणा केल्या जातील. बैठकीस पदाधिकाऱ्यांनी आपली मते मांडली . त्यात प्रामुख्याने महिला विभाग अध्यक्षा नयनाताई झाडे म्हणाल्या की , वरिष्ठांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभते . विभागातील सर्वानी मला सर्वांनी सहकार्य केले . ग्रामीणमध्ये थोड्या अडचणी आल्या त्यातून मार्ग काढला . संघटनेत राजकीय पक्षाची कोणतीही अडचण आली नाही . चांगल्या संघटनेत काम करत असल्याचा अभिमान वाटतो .
प्रशांत इखार , नागपूर ग्रामीण युवा जिल्हाध्यक्ष -आमच्या तेराही तालुक्याची कार्यकारिणी तयार झाल्या असून स्वयंसंचलित संघटनेत आपला कोणताही पदाधिकारी गेला नाही यापुढे विश्वासात घेवून नियुक्त्या व्हाव्यात अशी अपेक्षा
मंजूताई कारेमोरे – नियुक्ती झाली तेव्हा थोडाफार विरोध झाला मात्र वरिष्ठांनी दिलेल्या पाठबळामूळे धाडस मिळाले. लवकर समाज उपयोगी प्रकल्प वरिष्ठांना लेखी स्वरुपात पाठविणार आहे त्यास सर्वांनी सहकार्य करावे . मंगलाताई म्हस्के – नागपूर शहराची कार्यकारिणी जाहीर झाली असून महिलांमध्ये उत्साह आहे . वरिष्ठांनी आमच्या कार्यक्रमांना वेळ देवून उपस्थित रहावे .
कविता शेंद्रे – नागपूर जिल्हा महिला अध्यक्षा – काही नियुक्त्या बाकी आहेत . पदाला माझ्या परीने न्याय देण्याचा प्रयत्न करित असते . राजेशचंद्र बुरडे – नागपूर ग्रामीण जिल्हा अध्यक्ष – लवकरच नागपूर मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत . त्यावेळी समाज बांधव कोणत्याही राजकीय पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढला तरी त्यांच्या प्रचारासाठी वरिष्ठांनी यावे . शंकरराव गायधनी – नागपूर शहराच्या नियुक्त्या झाल्या आहेत .
डॉ . शशिकांत रोकडे विभागिय उपाध्यक्ष , नागपूर – कोरोना काळात रक्तदान , अन्नदान , धान्यवाटप , लसीकरण आदि कार्यक्रम घेतले . कुणाल पडोळे -आपल्या संघटनेची ताकद मोठी आहे . राज्याचा रोजगार मेळावा व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करतो तसेच बेरोजगार सेलची राज्य पातळीवरील जबाबदारी वरिष्ठ माझ्यावर सोपवणार आहेत ती मी निश्चीत पार पाडेल .
चंद्रशेखर गिरडे- न्याय देण्याचा प्रयत्न केला सर्वांना सोबत घेवून काम कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केला . थोडाफार समन्वयाचा अभाव होता तो आता दुर झाला . आमचे काही पदाधिकारी कोरोना रुग्ण व नातेवाईकांना जेवण पोहोचविण्याचे काम करित आहेत . विशेष पवन मस्के भंडारा उपाध्यक्ष यांचे अभिनंदन करण्यात आले . जगदीश वैद्य , युवा प्रदेश उपाध्यक्ष – पदाधिकारी नियुक्त्या करताना नावाकरिता न करता कामाकरिता निवड करावी तसेच सर्व आघाड्यांमध्ये समन्वय असावा . महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा मुळे मोठे पाठबळ मिळते . लवकरच राहिलेल्या युवा नियुक्त्या करण्यात येतील.
डॉ .प्रभाकर खंडाईत , सेवा आघाडी – नविन नियुक्ती असल्याने आताच काम सुरु केले कार्याला पुढे नेण्याचा प्रयत्न करेल .
अतुल वांदिले – वर्धा जिल्ह्यात कोणतीही अडचण नाही . हेवेदावे नाहीत , मात्र वरिष्ठांनी वेळोवेळी मार्गदर्शन करुन कार्यक्रम द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली .
बैठक अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली .
आभार प्रदेश सहसचिव बळवंतराव मोरघडे यांनी मानले .