सोयाबीन च्या हिरव्या शेंगांना फुटले कोंब..!
इसरुळ प्रतिनिधी
चिखली तालुक्यातील इसरुळ परिसरातील गावांमध्ये सप्टेंबरच्या २१ ते २८ तारखे पर्यंत अतिवृष्टीसह पावसाची संततधार चालू असल्यामुळे बांध बंधारे विहिरी ढासळल्या , कपाशीची बोंडे काळी पडली तसेच काढणीला आलेल्या उडीद, सोयाबीन पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून सोयाबीन च्या हिरव्या शेंगांना कोंब आले आहे.
एकरकमी पैसा देणारा ऊस पाऊस व वादळी वाऱ्याने भुई सपाट झाला आहे. भुईमूग जागेवरच कुजला आहे. शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला यामुळे उध्वस्त शेती अस्वस्थ शेतकरी असे चित्र परिसरात दिसून येत आहे. या पावसाच्या दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.डॉ.राजेंद्र शिंगणे साहेब यांचा इसरुळ परिसरात दौरा झाला होता. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी प्रशासनाला त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्याचाच भाग म्हणून दिनांक ७ ला ऑक्टोबर इसरुळ परिसरातील गावांचा दौरा तहसीलदार अजितकुमार येळे, तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे, शेळगाव आटोळ मंडळ अधिकारी सोनुने सबंधित गावचे तलाठी, कृषिसहायक यांनी इसरुळ, मंगरूळ, शेळगाव आटोळ या गावातील शेतात जाऊन नुकसानीची पाहणी करून तलाठी व कृषी सहायक यांना शेतात जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पिंकाचे पंचनामे करण्याच्या सुचना दिल्या. यावेळी शेतकऱ्यांसह चिखली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कृष्णा मिसाळ, इसरुळ चे सरपंचपती संतोष भुतेकर, गणेश पाटील, मंगरूळ चे माजी सरपंच शेनफड पाटील, समाधान गवते, अमोल इंगळे, संतोष आटोळे, पत्रकार भिकनराव भुतेकर आदी लोक उपस्थित होते.
✍️ भिकनराव भुतेकर
