मातृतीर्थ लाईव्ह च्या बातमी चा इम्पॅक्ट .त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये टाकलेल्या’रॉ’ मटेरियल ची तक्रारची महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी घेतली दखल
रिलायन्स इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा.ली. तढेगाव कॅप्म चे ‘प्रोजेक्ट मॅनेजर’ स्थळपाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मदत करणार का ?
प्रतिनिधी सचिन मांटे ( किनगावराजा ) – सिंदखेडराजा तालुक्यातील वाघजाई गावातील शेतकरी सुदर्शन रामकिसन सानप यांची शेतजमीन मौजे विझोरा शिवार ता.सिंदखेडराजा गट न. २६७ व मौजे शेलगाव शिवार गट क्रमांक. २२३ यांच्या दोन्ही गटामध्ये यांची मालकी जमीन आहे त्या लगतच शासनचा समृद्धी महामार्गचे काम सुरु आहे पण शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारची नोटीस व माहिती पत्रक व शेतकऱ्यांच्या संमतीविना शेतजमीनत समृद्धी महामार्गचे करोडो रुपयांचे रॉ मटेरियल टाकले गेले,
संबंधित शेतकऱ्यांनी वेळोवेळी काम अडवून काम बंद करण्याचा प्रयत्न केला,तरी सुद्धा त्याच्या शेतात रॉ मटेरियल डम्प केल्या गेले शेतकऱ्यानी वेळोवेळी निवेदन अर्ज वगरे देऊन आपली समस्या मांडणीचा प्रयत्न केला पण संबधीत अधिकारी वर्ग यांच्याकडून कुठल्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही उलट शेतकऱ्याला दमदाटी करण्याचा प्रयत्न केले गेले ? अशी प्रतिक्रिया सुदर्शन सानप यांनी ‘मातृतीर्थ live’ शी बोलतांना दिली .
सिंदखेडराजा तालुक्यातील वागजाई गावातील शेतकरी रमेश नाथजी सानप यांची जमीन समृद्धी महामार्गलगत आहे यांच्या शेताजवळच समृद्धी महामार्गची खडी मशीन सुरु आहे रमेश नाथजी सानप यांचा शेती गट क्रमांक.१५२आहे यालगच शेजारी महसूलच्या असलेल्या क्षेत्रात खडीमशीन सुरु आहे.त्या खडीमशीन मुळे आसपास च्या शेतात खडीच्या धूळमूळे रमेश नाथजी सानप सानप यांच्या शिवार वागजाई गट क्रमांक. १५२ मध्ये असलेल कपाशी पिक धुळीत गेलं कापूस पूर्ण काळा पडला असून बोन्ड गळ झाली यातच शेतकऱ्यांचे अंदाजे १,५०,००० रुपये एवढी नुकसान झाली आहे, रमेश नाथजी सानप यांनी केलेल्या अर्ज उपविभागीय कार्यालय ,तहसील कार्यालय सिंदखेडराजा,व्यवस्थापक समृद्धी महामार्ग,यांना निवेदन दिले होते.मातृतीर्थ लाईव्ह ने दिलेल्या बातमीमुळे नुकसानग्रस्त दि. ३/१/२०२२ शेतकऱ्याचा कपाशीचा पंचनामा केला.
मातृतीर्थ लाईव्ह ने लावलेल्या बातमी त्या शेतकऱ्याचा शेतामध्ये टाकलेल्या रो मटेरियल ची बातमी घेतली आणि त्या बातमीचे दखल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी घेतली आणि तसे पत्रही रिलायन्स इन्फ्रा प्रोजेक्ट प्रॉडक्ट लिमिटेड तडेगाव प्रोजेक्ट मॅनेजर यांना पाठवले या पत्रात त्यांनी असे म्हटले कि उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी सिंदखेड राजा यांचे पत्र या कार्यालयास प्राप्त झाले आहे पत्रात नमूद मौजे विजोरा येथील गट क्रमांक 267 व मौजे शेलगाव राऊत शिवारामध्ये गट क्रमांक 193 व 223 लगत समृद्धी महामार्गाचे निघालेले रॉ मटेरियल मोठ्या प्रमाणात डम्पिंग केलेले आहेत तसेच तक्रारदारांची कोणतीही परवानगी न घेता रॉ मटेरियल टाकण्यात आले असून शेती मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असे तक्रारीत नमूद केले आहे तसेच रॉ मटेरियल तात्काळ उचलून घेण्यात यावे व झालेल्या शेतमालाची नुकसान भरपाई मिळणे बाबत विनंती केलेली आहे तरी प्रोजेक्ट मॅनेजर यांना स्थळ पाहणी करून नियमानुसार योग्य ती कारवाई करून अहवाल सादर करण्याचे कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी केले आहे . आता हे पाहावे लागेल तवा प्रोजेक्ट प्रॉडक्ट लिमिटेड तळेगाव कॅम्प चे प्रोजेक्ट मॅनेजर स्थळ पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणार का ?