मातृतीर्थ लाईव्ह च्या बातमीचा इम्पॅक्ट : अखेर त्या शेतकऱ्यांच्या बांदावर पोहचले महसूल प्रशासन,नुकसानीचा केला पंचनामा – समृद्धी महामार्ग व्यवस्थापक मदत करणार का?
किनगावराजा (प्रतिनिधी सचिन मांटे) -सिंदखेडराजा तालुक्यातील वागजाई गावातील शेतकरी रमेश नाथजी सानप यांची जमीन समृद्धी महामार्गलगत आहे यांच्या शेताजवळच समृद्धी महामार्गची खडी मशीन सुरु आहे रमेश नाथजी सानप यांचा शेती गट क्रमांक.१५२आहे यालगच शेजारी महसूलच्या असलेल्या क्षेत्रात खडीमशीन सुरु आहे
.त्या खडीमशीन मुळे आसपास च्या शेतात खडीच्या धूळमूळे रमेश नाथजी सानप सानप यांच्या शिवार वागजाई गट क्रमांक. १५२ मध्ये असलेल कपाशी पिक धुळीत गेलं कापूस पूर्ण काळा पडला असून बोन्ड गळ झाली यातच शेतकऱ्यांचे अंदाजे १,५०,००० रुपये एवढी नुकसान झाली आहे, रमेश नाथजी सानप यांनी केलेल्या अर्ज उपविभागीय कार्यालय ,तहसील कार्यालय सिंदखेडराजा,व्यवस्थापक समृद्धी महामार्ग,यांना निवेदन दिले होते.मातृतीर्थ लाईव्ह ने दिलेल्या बातमीमुळे नुकसानग्रस्त दि. ३/१/२०२२ शेतकऱ्याचा कपाशीचा पंचनामा केला पंचनामा करताना मंडळअधिकारी घुगे,घरजाळे,व शेतकरी उपस्थित होते.