बुलढाणा : मेहकर रवींद्र सुरुशे -: माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा हिवताप अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र डोणगाव अंतर्गत डोणगाव,आरेगाव,अंजनी, आंध्रड,लोणीगवळी,पांगरखेड , शेलगाव देशमुख,गोहगाव, या सर्व नऊ उपकेंद्रांमध्ये हिवताप जनजागरण मोहीम घेण्यात येत आहे.या मोहिमेअंतर्गत किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हिवताप व डेंगू आजाराबाबत जनजागृती करण्यात येत आहे. तसेच पाणी असलेल्या ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात येतअसून जनजागृती पत्रक वाटून जनजागृती करण्यात येत आहे.तसेच कार्य क्षेत्रातली प्रत्येक खाजगी लॅबला भेटी देऊन त्यांना डेंगू आजाराबाबत माहिती देण्यात आली.व आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा असे आवाहन करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ.अमोल गवई यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण २७ गावांमध्ये ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेसाठी वैद्यकीय अधिकारी,आरोग्य सहाय्यक,आरोग्य सेवक,सेविका परिश्रम घेत आहेत.