बीबी चोरपांग्रा ( अँड योगेश जायभाये ) – संपूर्ण बुलडाणा जिल्हा कोरोना मुक्त होण्याच्या मार्गावर असतांना, चोरपांग्रा येथे एकदम एका दिवसात ३६ रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे.इतका मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळल्या नंतर सुद्धा, प्रशासन अगदी संथ गतीने काम करतांना दिसत आहे, गावामध्ये वैद्यकीय तपासणी करणारी टीम अगदी ११ च्या सुमारास येत असून, ग्रामीण भागातील बहुतांश लोक शेतकरी असल्याने ते अगदी सकाळीच शेतात जात असल्यामुळे, इथे ज्या प्रमाणावर कोरोनाच्या RT-PCR टेस्ट होणे गरजेचे असतांना सुदधा, जवळपास ३ हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असतांना या ठिकाणी दिवसाला २०,२६ अशा स्वरूपात टेस्ट होत आहेत. ग्रामीण भाग असल्याने अफवांवर लोकांनी विश्वास न ठेवता टेस्ट करणे गरजेचे आहे परंतु नागरिक टेस्ट करण्यासाठी स्वतःहा येत नसून, त्यासाठी प्रशासनाने लोकांचे, मनोबल वाढवणे गरजेचे आहे. त्याच सोबत गावाची जंतुसंसर्ग नाशक फवारणी करणे गरजेचे आहे.परंतु टेस्ट करण्याचे काम गतीने प्रशासन जर याच गतीनेकरत असेल तर मग, संपूर्ण गाव कोरोना मुक्त कसे होणार..? असे येथील सुशिक्षित नागरिक प्रश्न विचारत आहेत.
हे गाव राष्ट्रीय महामार्गावर असल्याने, तसेच एका बाजूने बिबी तर दुसऱ्या बाजूने दुसरबीड सारखी मोठी गावे असल्याने, त्या ठिकाणी गावातील लोकांची मोठ्या प्रमाणावर, दुध विक्री, किराणा खरेदी, तसेच इतर खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणावर असल्याने रहदारी सारखी आहे, आणि जर या दोन्ही गावात कोरोना पसरल्यास तो आटोक्यात आणणे शक्य होणार नाही.यामुळेच जिल्हा पातळीवरील, तसेच तालुका पातळीवरील अधिकारी, आरोग्य अधिकारी यांनी, योग्य नियोजन करून, पोलीस प्रशासनाची मदत घेवुन, तात्काळ ठोस पावले उचलुन गाव कोरोना मुक्त करावे, अशी मागणी ऍड.योगेश जायभाये यांच्या सह गावकऱ्यांन कडून होत आहे.