गजानन सोनटक्के जळगाव जा . – बुलढाणा जिल्यासह १८ जिल्ह्या मध्ये होम क्वारंटाईन बंद ! – महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय – .राज्यात या पुढे कोरोना पेशंट सापडल्यास – त्याला आता होम आयसोलेशन मध्ये ठेवता येणार नाही – असे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले . बुलढाणा जिल्यासह राज्यातील १८ जिल्यातील कोरोना रुग्णाना आता केवळ – कोविड सेंटरमध्येच आयसोलेशन मध्ये ठेवण्यात येईल.
होम आयसोलेशन हे आता पूर्णपणे बंद होणार आहे – होम आयसोलेशन मधील रुग्ण बाहेर फिरत असल्याने हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे . होम क्वारंटाईन बंद होत असलेल्या जिल्ह्यात – बुलढाणा,पुणे, नागपूर, रायगड, , कोल्हापूर, रत्नागिरी, तसेच सांगली, यवतमाळ, अमरावती, सिंधुदुर्ग, सोलापूर, अकोला, सातारा, वाशिम, बीड, गडचिरोली, अहमदनगर, व उस्मानाबादचा समावेश आहे .राज्यातील प्रत्येक नागरिकांसाठी तसेच बुलढाणा जिच्यासाठी हि बातमी नक्कीच खूप महत्वाची आहे.