
बुलढाणा मेहकर रवींद्र सूरूशे – 3 लाख 80 हजाराचा माल जप्त मेहकर तालुक्यातील बदनापूर येथे गुटखा
विक्रेत्याला रंगेहाथ पकडल्याची घटना 24 जून रोजी सकाळी 11 वाजता घडली
मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी बदनापूर येथे एल सी बी चे सुधाकर काळे
व संजय नागवे यांनी गुटखाविक्रेत्याला रंगेहाथ पकडले त्याच्याजवळ ३ लाख 80
हजार 475 रुपयाचा गुटखा पकडण्यात आला तंबाखू विमल नजर पुड्या व इतर माल हस्तगत करण्यात आला .आरोपी आश्रुबा दादाराव आसोले वय 35 राहणार बदनापुर असे आरोपीचे नाव असून फिर्यादी स्था.गु. वि.चे सुधाकर काळे यांनी पोलीस
स्टेशनला आणून अपराध नंबर कलम १८८/२७०.२७३ भादविनुसार सह कलम २६/६४/२१(i v)५९कलम गुन्हे दाखल करण्यात आले आहे . पुढील तपास ठाणेदारप्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली संजय पवारहे करत आहेत