तालुक्यातील छायाचित्रण व्यवसाया बरोबर सामाजिक भान ठेवून काम करणाऱ्या तीन छायाचित्रकार व पत्रकाराना कलात्मक योगदान व सेवाभावी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .
गजानन सोनटक्के जळगाव जामोद रविवारी दि 26 सप्टेंबर ला मुक्ताईनगर तालुक्यातील चारठाना या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या तपोवन भवानी मंदिर येथे संपन्न झालेल्या ‘सोहळा मैत्रीचा क्षण आनंदाचा 2021’ या उपक्रमा अंतर्गत जळगांव जामोद तालुक्यातील प्रसिद्ध पत्रकार व छायाचित्रकार आश्विन राजपूत यांनी जलसंधारण, पर्यावरण, व उंबरदेव ते कुवरदेव ह्या सातपुडातील वन वाचवण्यासाठी केलेले भरीव कार्यासाठी,तर धानोरा महासिध्द येथील ग्रा.पं. सदस्य ,पत्रकार व फोटोग्राफर संदीप भोपळे यांनी कोरोना काळात विविध उपक्रमात, रक्तदान शिबिरात सक्रिय सहभाग ,तसेच जलसंधारण व पर्यावरण जोपासल्याबद्दल , त्याचप्रमाणे मानेगावचे तरुण उपसरपंच, पत्रकार तथा फोटोग्राफर शिवाजी पेसोडे पाटील सामाजिक उपक्रम राबवित ग्रामपंचायत अविरोध निवडूनक करून उपसरपंच बनण्याबद्दल ,व गावातुन अवैध धंदे बंद करण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असा ह्या पुरस्कार च स्वरूप असून राज्यभरात 44 लोकांना हा सन्मान देण्यात आला
मुक्ताईनगर तालुक्यातील 11 छायाचित्रकार समितीनी हा राज्यस्तरीय सोहळा आयोजित केला होता व महाराष्ट्र मध्यप्रदेश येथून हजारो छायाचित्रकार सह राज्यभरातील फोटो व सिने इंडस्ट्रीतील दिग्गज या कार्यक्रमाला हजर होते.
सुप्रसिद्ध छायाचित्रकार व प्रशिक्षक उदय देसाई सर, मिलिंद देशमुख सर,विनोद देशपांडे सर इत्यादी मान्यवरांनी या पुरस्काराचे वितरण केले .
या तिन्ही छायाचित्रकार व पत्रकारांनी आपले काम सांभाळून सामाजिक भान जपत कार्य केल्याने जळगाव जामोद तालुक्यात तीन पुरस्कार आल्याने सर्वस्तरातून यांचे कौतुक होत आहे.