गजानन सोनटक्के
गजानन सोनटक्के जळगाव जा
जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव ही मोठी ग्रामपंचायत असून नागरिकांना येथे दिवा कर घरकर पाणीपट्टी कराचा भरणा करावा लागतो परंतु ज्या नागरिकांकडे घर कर बाकी आहे
अशा नागरिकांना ग्रामपंचायत प्रशासना कडून सात दिवसाच्या आत आपण कराचा भरणा करावा अशी नोटीस दिल्या जाते परंतु या नोटीस वर कोणत्याच प्रकारचा आवक जावक क्रमांक टाकल्या जात नाही व मागील घरकर न बघता व वजा न करता बेजबाबदारपणे नागरिकांना नोटीस दिल्या जात आहे असाच प्रकार येथे घडला आहे सुनगाव येथील कल्याण सिंह गुलाबसिंह राजपूत यांनी ग्रामपंचायत कार्यालय येथे 5 / 4/2021रोजी पंधराशे रुपयाची पावती घेऊन घर कर भरलेला आहे परंतु सदर पंधराशे रुपये हे चालू वर्षात वजा न करताना त्यांना सत्तावीसशे रुपयाची नोटीस ग्रामपंचायत प्रशासनाकडून दिली आहे
व त्यांनी 24 /12 /20 20 रोजी 5730 रुपयाचा घर कर भरला व पावती घेतली परंतु पावतीवर ग्रामपंचायत कार्यालय यांचा शिक्का व कुठलाही आवक जावक क्रमांक नाही यावर फक्त ग्रामपंचायत कर्मचारी संतोष ताडे यांची सही आहे व सदर नोटीस हे ग्रामपंचायत सरपंच व सचिव यांच्या सहीनिशी देण्यात आली आहे व नियमानुसार नोटीस व कराची पावती यावर शिक्का व आवक जावक क्रमांक असायला हवा असतो परंतु सूनगाव ग्रामपंचायत येथील कर्मचाऱ्यांनी हे नियम सर्व ग्रामपंचायतीमध्ये खुंटीला टांगले आहेत हे यावरून स्पष्ट होत आहे तरी त्यावरून कर्मचाऱ्यांचा बेजबाबदार पणा उघडकीस आलेला आहे याचाच भुर्दंड सुनगाव येथील नागरिकांना सोसावा लागत आहे तरी या प्रकरणाची पंचायत समिती व जिल्हा परिषद प्रशासनाकडून चौकशी होण्याची गरज आहे