नाली संदर्भात ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज घेऊन येणाऱ्या नागरिकास ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची शिवीगाळ व ओढताढ
गजानन सोनटक्के जळगाव जा – जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव ग्रामपंचायत स्थानिक वार्ड क्रमांक तीन मध्ये राहत असलेला राहुल राऊत नामक तरुण हा त्याच्या घराजवळील फुटलेल्या नालीच्या पाण्याच्या तक्रारीच्या संदर्भात दोन ते तीन दिवसा अगोदर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये तक्रार अर्ज घेऊन गेला होता परंतु ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी संतोष ताडे यांनी या तरुणाकडे अर्ज स्वीकारण्यासाठी विमल गुटखा पुडीची मागणी केली परंतु सदर राहुल या युवकाने गुटका पुडी देण्यास नकार दिला त्यामुळे या संतोष ताडे कर्मचाऱ्याने त्याचा अर्ज घेण्यास नकार दिला व अर्ज का घेत नाही असे म्हणताच संतोष ताडे कर्मचाऱ्याने राहुल याला ओडताड केली व शिवीगाळ केली.
यावरून ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची मुजोरी निदर्शनास आली आहे सविस्तर असे की वार्ड नंबर तीन मध्ये राहुल राऊत यांच्या घराजवळ सांडपाण्याची नाली हे फुटलेली आहे व तेथे पाणीपुरवठा योजनेचा वाल असल्यामुळे या वालमध्ये नालीचे दूषित पाणी जात आहे व नालीचे पाणी रस्त्यावर येऊन परिसरात घान साचलेली आहे या संबंधित तक्रारीसाठी युवक ग्रामपंचायत कार्यालयात तक्रार अर्ज घेऊन गेला होता व तोंडी स्वरूपात सरपंच यांना सांगितले परंतु सरपंच यांनी कोणतीच दखल घेतलेली नाही व वाल मध्ये जाणाऱ्या नाल्याच्या पाण्याविषयी कोणतीही तरतूद केलेली नाही परंतु सुनगाव ग्रामपंचायत मध्ये कार्यरत असलेला संतोष ताडे नामक कर्मचारी याची तक्रार घेऊन आलेल्या तरुणाला विमल गुटखा पुडीची मागणी व त्याला ओडताड करणे यावरून या कर्मचार्याची मुजोरी व दादागिरी निदर्शनास येत आहे.
या अशा वागणाऱ्या व ग्रामपंचायत कार्यालयामध्ये धूम्रपान करणाऱ्या कर्मचाऱ्यावर सरपंच व ग्रामसेवक यांनी तात्काळ कार्यवाही करावी व येथीलच राहुल राऊत यांचे मामा शत्रुघ्न फुसे यांनी परिसरामध्ये घाण असल्याचे व वालमध्ये दूषित पाणी जात आहे परिणामी आमचे आरोग्य धोक्यात आले आहे व ग्रामपंचायत कार्यालय कुठलीही व्यवस्था करीत नसल्याचा व ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने त्यांच्या भाच्याला ओढताढ केल्याचा व अर्ज न स्वीकारल्याचा आरोप केला आहे तरी सुनगाव ग्रामपंचायत कार्यालयामध्ये चालणाऱ्या गैरप्रकाराबद्दल व कर्मच्याऱ्याच्या अशा वागण्याची पंचायत समिती प्रशासन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची चौकशी करून कार्यवाही करणे गरजेचे आहे सदर नालीच्या पाण्यासंदर्भात अर्जाची प्रत पंचायत समिती प्रशासन यांना दिलेली आहे