जळगाव जामोद -गजानन सोनटक्के जळगाव जामोदतालुक्यातील सुनगाव ग्रामपंचायत हे नेहमीच चर्चेत असते तसेच सर्व नियम व अंदाजपत्रक हे धाब्यावर ठेवून सूनगाव ग्रामपंचायत ही विकास कामांचा वाजागाजा करीत असते गेल्या जानेवारी महिन्यामध्ये वार्ड नं चार मधील गोरक्षनाथ मंदिराकडे रस्त्यावरील पुलाच्या भ्रष्टाचाराचे उदाहरण ताजे असताना त्याबाबतीत झालेल्या तक्रारी व उपोषणकर्त्याचे उपोषण व तेव्हापासून सुनगाव ग्रामपंचायत ही विकास कामांच्या बाबतीत पाच सहा महिने ठप्प असल्याचे दिसत आहे
परंतु आता 15 वित्त आयोगातून वार्ड नंबर 3 मध्ये असलेला सिमेंट रसत्याच्या कामात ग्रामपंचायत आपला मनमानी कारभार करीत असल्याचे निदर्शनास येत आहे या रस्त्याचे खोदकाम हे व्यवस्थित केलेले नाही व त्यावरील अंदाजपत्रक हे लावलेले नाही व काम कोणत्या निधीतून आहे याचे नामफलक सुद्धा लावलेले नाही व खोदकाम केलेल्या रस्त्यावर मोठे मोठे दगड ग्रामपंचायत सुनगावने आणून टाकलेले आहे व अंदाजपत्रकात खोदकाम केल्यानंतर त्यावर 80 mm टाकणे जरुरी असते परंतु अंदाज पत्रकाला फाटा देत ग्रामपंचायत ही आपल्या मनमानी कारभाराने रोडचे काम करीत आहे
संबंधित पंचायत समिती शाखा अभियंता काळपांडे हे सुद्धा या कामाकडे दुर्लक्ष करीत आहेत तरी या कामाचे अंदाजपत्रक हे कामाच्या ठिकाणी लावावे व नामपलक लावावे व काम हे अंदाजपत्रकानुसार करावे अशी मागणी येथील स्थानिक नागरिकांनी केली आहे