मातंगपुरी पुनर्वसनाच्या नावाखाली दलित समाजाला गाव कुसा बाहेर काडून देण्याचे षळयंत्र : गोपाल तायडे.
शेगाव : प्रतिनिधी.
मातंगपुरी पुनर्वसनाच्या नावाखाली दलित समाजाला गाव कुसा बाहेर काडून देण्याचे षळयंत्र : गोपाल तायडे.
शेगाव : प्रतिनिधी.
150 वर्षा आगोदर पासून शेगाव शहराच्या गाव कुसा बाहेर मातंग हा दलित समाज गुण्यागोविंदाने वास्तव करून राहत होता. कालांतराने मातंग वस्ती ही शेगाव शहराच्या मधोमध आल्याने मातंग समाजाच्या या वस्थिच्या जागेला महत्त्व प्राप्त झाले. मधल्या काळात शासनाची वक्र दृष्टी मातंगपुरी परिसरावर पडली मातंग वस्तीचे पुनर्वसन करण्याची योजना शासना कडून आखण्यात आली मातंगपुरी परिसरातील कुटूंबियांना वगवेगळ्या प्रकारचे अस्वसन,प्रलोबन शासना कडून देण्यात याले. त्याच बरोबर नांदेळ पुनर्वसना प्रमाणे शेगाव मातंगपुरी चे पुनर्वसन करण्यात येईल. अश्या प्रकारच्या भूलथापा देऊन विश्वासात घेण्यात आले मातंगपुरी परिसरातील सामान्य नागरिक येणाऱ्या पीढीचा विचार करून विकासच्या दृष्टीकोनातून शासनाच्या मायाजालात अळकले व आपली लाख मोलाची बाप पूर्वजांची जमीन शासनाला देण्यास तयार झाले. मातंगपुरी परिसरातील कुटूंबियांचे पुनर्वसन करण्यात आले खरे परंतु पुनर्वसनाच्या नियमाचे काटेकोर पणे पालन करण्यात आले नाही.ज्या नांदेळ मॉडेल प्रमाणे पुनर्वसन करण्यात येईल असे आश्वास दिले होते. त्या प्रमाणे पुनर्वसन करण्यात आले नाही. पुनर्वसितांना राहत असलेल्या जागेचा सात बारा मिळाला नाही जागेची नोद नजुल कर्यालयात झाली नाही,पुनर्वसन नियमा नुसार प्रकल्प ग्रस्त प्रमाण पत्र मिळाले नाही,निकृष्ट दर्जाचे सदनिका बांधण्यात आल्या सदनिकेची दुरुस्थी ही अजून पर्यंत करण्यात आली नाही. ,शासन प्रशासनाला सहकार्या बद्दल घर पट्टी, पाणी पट्टी, माफ करावी होती
मातंगपुरी परिसरातील दुकानदारांना नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये गाळे द्यावे होते, पुनर्वसीतांना रोजगार देण्यात द्याला होता,मतांगापुरी परिसरात घर असून सुद्धा ज्याना घेरे मिळाली नाही त्यांना घरे द्यायाला पाहिजे होती. म्हाडा कॉलनीत प्राथमिक शाळा,अंगणवाळी नाल्या, चेंबर,रस्ते, स्ट्रेट लाईट, गार्डन,सभागृह,बद्दल सुविधा देण्यात यावे होते, मातंगपुरी पुनर्वसितांना या सर्व सुविधा पासून जाणीव पूर्वक वंचीत ठेवण्यात आले.परंतु असे न होता पुनर्वसनाच्या नावाखाली मातंग या दलित समाजाला गाव कुसा भायेर काढून देण्याचे शळयंत्र करण्यात आले असा आरोप स्वाभिमानी शहर अध्यक्ष गोपाल तायडे यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना केला आहे.