खत दुकानदार जादा भावाने खत विक्री करत असेल तर शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी संपर्क साधावा.: गोपाल तायडे
शेगाव : प्रतिनिधी
मा. राजू शेट्टी साहेब
(स्वस्थापक अध्यक्ष स्वा.शे. संघटना) यांनी
केंद्र सरकारच्या वाढलेल्या खत दरा विषयी पुकारलेल्या राज्य व्यापी आंदोलनाचा धसका घेत केंद्र सरकारने खतावरील वाढलेल्या किमती कमी केल्या.
परंतु खत दुकानदारांनी वाढत्या दराने चढ्या दराने खत विक्री चालू आहे असे समजते.
खरीप हंगामाला सुरवात झाली आहे. केंद्र सरकारने खतावरील सबसिडी कायम ठेवल्याने खाताची किंमती कमी झाल्या आहेत.शेतकऱ्यांची युरियाला जास्त मांगणी असते.त्यामुळे सबसिडीवर युरियाचा पुरवठा होतो. खत दुकानदारांना युरियाची विक्री पॉश मशीनवर बांधणाकारक केली आहे.
या मुळे खत दुकानदारांनी पॉश मशीनवर शेतकऱ्यांचा आधार क्रमांक नोंदवून खत विक्री करावी व ते गरजेचे आहे शेतकऱ्यांना पॉश मशीन द्वारे खत विक्री दुकानदार करत नसेल तर
जुन्या दराणी खत विक्री चालू आहे असे स्पष्ट होते. दुकानदाराने शेतकऱ्यांना बियाने खतचे पक्के बिल देणे बंधनकारक आहे.पक्या बिलाशिवाय शेतकऱ्यांनी खत व बियाणे खरीदी करू नये. आणि कोणी दुकानदार खत जादा भावाने विक्री करीत असेल तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी संपर्क साधावा. असे स्वाभिमानी शेगाव शहर अध्यक्ष गोपाल तायडे यांनी म्हटले आहे.