शेगाव : प्रतिनिधी.
शेगाव शहर व तालुक्यात कोरोना महामारीने भयावह परिस्थिती उत्पन केली असून. शासकीय रुग्णालय तसेच खाजगी हॉस्पिटल मध्ये बेड व ऑक्सिजचा तुटवाळा जाणवत आहे. शेगाव शहर व लगतचा ग्रामीण भाग हा वैद्यकीय उपचाराकरिता शासकीय
साई बाई मोटे उपजिल्हा रुग्णनांलया शेगाव वर्ती अवलंबून आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने रुग्णा करिता शासकीय रुग्णालयात बेड व ऑक्सिजन कमी पडत आहेत त्या मुळे रुग्णानां खामगाव, अकोला, बुलढाणा येथे (रेफर) पाठवल्या जात असल्याने रुग्णानां व नातेवाईकांचे खूप हाल होत आहे. शेगाव व तालुक्यात कोरोनाचे रुग्ण संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत अस्ताना देखील शासकीय रुग्णालयात अतिरिक्त बेड,व ऑक्सिजन ची संख्या अजून पर्यंत वाढवली नसल्याने रुग्णालय प्रशासनाने बेड व ऑक्सिजन वाढवण्यासाठी शासनाना सोबत संपर्क केला की नाही हा प्रश्न उधभवतो. आणि केला असेल तर मंग बेड व ऑक्सिजन चा तुटवळा का पळत आहे. शासन प्रशासन रुग्णांचा जीव जाण्याची वाट पाहत आहे का.?असा सवाल स्वाभिमानी शहर अध्यक्ष गोपाल तायडे यांनी केला आहे.गरीब रुग्नांना खाजगी हॉस्पिटल परवळत नसल्याने रुग्णांना शासकीय रुग्णालय शिवाय पर्याय नाही.हि बाब लक्षात घेऊन शासकीय रुग्णालयात त्वरित अतिरिक्त बेड व ऑक्सिजन ची व्यवस्थापना करावी अशी मांगणी स्वाभिमानी शेतकरी संघटना शेगाव शहर अध्यक्ष गोपाल तायडे यांनी केली आहे.