वीज जोडनी न तोडता आवाजावी वाढीव वीज बिल दुरुस्ती करून वीज बिला मध्ये सवलात द्यावी. -स्वाभिमानीची मागणी

शेगाव – माघील दिड वर्षा पासून कोरोना महामारी मुळे सर्व जणता आर्थिक दृष्ट्या हतबल झाली आहे. कोरोना मुडे सर्व उद्योगधंदे व्यवयाय बंद होते. सत्तच्या पावसाने शेतातिल उत्पन्न बुडाले अशा सर्व संकटाने शेतकरी शेतमजुर व सर्व सामान्य जनता आर्थिक दृष्ट्या खचुन गेलेली आहे. अश्या परिस्तिथी कोरोनाची पहिली लाट गेल्या नंतर दुसऱ्या लाटेसोबत सर्व सामान्य जनता शासनाला ला सहकार्य करीत आहे. आणि आत्ता तिसरी लाट येण्याचे संकेत आहेत. या कोरोनाच्या लाटेमध्ये सामान्य जनता होरपडून निघत आहे. आर्थिक परिस्थिती मुडे सर्वसामान्य जनता पूर्णतःव हतबल झाली आहे. या अश्या व्यवस्थित आपल्या वीज वितरण मंडळ या आपल्या विभागाकडून सक्तीची वसुली करण्याकरिता आपले कर्मचारी येत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोरोना काळातील विधुत ग्राहकांचे रिडींग पेक्षा जास्त बिल व सक्तीच्या वसुली विरोधात आंदोलन केले आहे. शासन या कडे सपशेल दुर्लक्ष करीत आहे. याचा अर्थ वीज ग्राहकांचे वीज जोडणी तोडणे हा होत नाही. आपल्या विभागा कडून अगोदर आवाजावी वीज बिला संदर्भात वीज ग्राहकांची अळचन जाणून घ्यावी लागेल.
बरेच ग्राहकांना रिडींग पेक्षा जास्त बिल आले आहे.त्या मुडे रिडींग चेक करून विधुत जोडणी न तोडता बिला मध्ये हप्ते पडून देऊन कोरोना मुडे आर्थिक संकटात सापडलेल्या व हातभल झालेल्या विधुत ग्राहकांना आपण दिलासा द्यावा अश्या तऱ्हेचे निवेदन स्वाभिमानी शहर अध्यक्ष गोपाल तायडे यांनी दिले आहे.