Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

गौंढाळा कंबरखेड ग्रामपंचायतच्या माध्यमातून कोरोना जनजागृती.

go karona

मेहकर रवींद्र सुरूशे – कोरोणाची तिसरी लाट रोखण्यासाठी गंवढाळा-कंबरखेड गट ग्रामपंचायतीच्या माध्यमातून महिला सरपंच सौ.ताई गजानन जाधव ह्या जिल्ह्यात कोरोनाजनजागृतीच्या सामाजिकउपक्रमातून नावलौकिक झाल्याआहेत .गावासह तालुकाव जिल्हास्तरावर कोरोना जनजागृती करुन गावाच्या वेशीवरच पहिली व दुसरी लाट थोपवण्याचा प्रयत्न केला आहे आज गावात महिला सरपंचांनी चिमुकल्या मुलांच्या माध्यमातून जनजागृती रॅली काढण्यात आली.यावेळी गावातील महिला-पुरुष
दारातच उभे राहून या महिलासरपंच व चिमुकल्या मुलांच्याकोरोना जनजागृतीच्या रॅलीवरफुलांची उधळण केली आहे. चिमुकल्या मुलांनी जनजागृती रॅली मध्ये घोषवाक्यांचे फळकझळकवत घोषणाबाजी केली यामध्येगो-कोरोना,लसीकरण करा कोरोना ला पळवा,योग्यवेळी मास्क वापरा, सुरक्षित अंतरठेवा, चिमुकल्यांची काळजी घ्या अशा विविध घोषणाबाजी करत चिमुकल्यांची कोरोना जनजागृती रॅली काढण्यात आलीहोती.यावेळी महिला सरपंचसौ.ताई गजानन जाधव यांनीसंपूर्ण गावकऱ्यांचे आभार व्यक्त करत आपले मत व्यक्त केले की आता पहिल्या व दुसऱ्या कोरोनाच्या लाटेपेक्षा तिसरी लाट चिमुकल्या मुलांसाठी घातकअसुन चिमुकल्यांची जबाबदारीही पालकांची व घरच्यांची आहे.चिमुकल्यांचे इतर हट्ट पुरवितांना त्यांच्या आरोग्याची काळजी राखणेही आवश्यक आहे.मात्र मुलांना विनामास्क बाजारातघेऊन जाताना दिसून येतात.स्वत:ही पुर्ण मास्क लावतनाहीत.त्यामुळे संभाव्य तिसऱ्यालाटेत बालकांमध्ये कोरोनाचासंसर्ग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.आता पालकांनी चिमुकल्या मुलांची जबाबदारी स्वीकारावी असेप्रतिपादन केले यावेळी सरपंच सौ.ताई गजानन जाधव,उपसरपंचअलका संदिप खरात, पंचायतसमितीचे विस्तार अधिकारी एस.बी. पंडागळे, कृषीसहायक जे.जे.आरु, आरोग्यसेवक धनंजय जाधव,श्रीमती टी.टी.दांडगे,ग्रामसेवक पी.बीदेशमुख,मुख्याध्यापक मारोतीनिकम,आरोग्य सेविका एस.बी.शेळके,अंगणवाडी सेविका श्रीमती रेखा शेळके,मदतनीसवच्छलाबाई धोंडगे,श्रीमतीकिरण निकम,श्रीमतीसरदार,किरण धोंडगे व रमेशरहाटे, गजानन जाधव,समाधानधोंडगे,कैलास धोंडगे,विनोदखरात,गजानन धोंडगे,संदिपधोंडगे,मंगेश वानखेडे, विशालजाधव,पंढरीनाथ धोंडगे,भुषणसरदार, एकनाथजाधव,गजाननधोंडगे आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.