श्री मारुती गणेश मित्र मंडळ दे. माळी चा अनोखा उपक्रम;मोफतरोग निदान शिबिर ठेवुन करीत आहे गणेश उत्सव साजरा.
रवींद्र सुरूशे प्रतिनिधी -श्री मारुती गणेश मित्र मंडळ देऊळगाव माळी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे मंडळ म्हणून परिसरात नाव लौकिक आहे. त्याच अनुषंगाने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विशाल मगर यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक १६ सप्टेंबर वार गुरुवार ला मंडळाच्या वतीने भव्य मोफत बालरोग तपासणी व औषध वाटप शिबीर ठेवण्यात आले होते.
शिबिरासाठी गावकर्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरासाठी मेहकर येथील प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉक्टर विकास कापसे यांचे योगदान मिळाले. यावेळी शिबिराचे उद्घाटन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विषाल मगर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख उपस्थिती म्हणून माजी तंटामुक्ती अध्यक्ष राजेश मगर, व अन्य मान्यवर मंडळी उपस्थित होते.शिबिर यशस्वीतेसाठी आकाश राऊत,शिवाजी मगर
Compny.Meyer organics pvt Ltd. व मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यानी मेहनत घेतली.