बुलडाणा – दि. 7 : राज्यात कोविड -19 संसर्ग पार्श्वभुमीवर घरकाम करणाऱ्या नोंदणीकृत घरेलू कामगारांना राज्य शासनामार्फत प्रत्येकी 1500 रुपये मदतीचा आधार मिळणार आहे. ही रक्कम थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याणकारी मंडळातर्गत 2011 ते 31 मार्च 2021 या कालावधीत नोंदणी केलेल्या घरेलू कामगारांना प्रत्येकी 1500 रुपये प्रमाणे अर्थसहाय्य देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. सदर योजनेचा लाभ मिळण्याकरिता बँकेचे पासबुक, नोंदणीकृत नुतणीकरणाची पावती, आधारकार्ड, राशनकार्ड आवश्यक सर्व कागदपत्र, मोबाईल क्र. स्वयंसांक्षकित करुन कार्यालयाच्या gharelu buldhana@gmail.com या ईमेल आयडीवर सादर करावी. जेणेकरुन कुठलाही नोंदीत घरेलू कामगार लाभापासून वंचित राहणार नाही, याची नोंद घ्यावी, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
Related Posts