Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

गहू खरेदीसाठी 9 केंद्रांना मान्यता खरेदीला मुदतवाढ 30 जुनपर्यंत सुरू राहणार खरेदी

बुलडाणा दि.10 : जिल्ह्यात केंद्र शासनाच्या आधारभुत किंमत योजनेअंतर्गत राज्य शासनाच्यावतीने हमी दराने गहू व ज्वारी खरेदी 30 जुन पर्यंत सुरु करण्यात आली आहे.  गहू खरेदीसाठी शासनाने 7 हजार 485 क्विंटलचे उदिष्ट व ज्वारी खरेदीसाठी 13 हजार 500 क्विंटलचे उदिष्ट दिलेले आहे.

gehu

   तसेच जिल्ह्यामध्ये गहू खरेदीसाठी 254 दोतकऱ्यांनी नोंदणी केलेली असुन ज्वारी खरेदीसाठी 5928 शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे.  जिल्ह्यामध्ये पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समितीची सभा संपन्न झाली असुन त्यानुसार जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी गहू खरेदीसाठी 9 केंद्रांना मान्यता दिली आहे. यामध्ये तालुका शेतकी सह. खरेदी विक्री समिती मर्या. बुलडाणा, मेहकर, लोणार, संग्रामपूर, मलकापूर, जळगाव जामोद व खामगाव यांचा समावेश आहे. तसेच  संत गजानन कृषि विकास शेतकरी उत्पादक कंपनी मोताळा,  सोनपाऊल अँग्रो प्रोड्युसर कंपनी, सुलतानपुर केंद्र- साखरखेर्डा यांचाही गहू खरेदी केंद्रामध्ये समावेश आहे. तसेच ज्वारी खरेदीसाठी 14 केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये तालुका शेतकी सह. खरेची विक्री समिती मर्या. बुलडाणा, मेहकर, लोणार, देऊळगावराजा, संग्रामपुर, शेगांव, मलकापूर, जळगाव जामोद व खामगाव यांचा समावेश आहे. तसेच संत गजानन कृषि विकास शेतकरी उत्पादक कंपनी, मोताळा, सोनपाऊल अँग्रो प्रोड्युसर कपनी, सुलतानपुर केंद्र साखरखेर्डा, स्वराज्य शेतीपुरक सहकारी संस्था मर्या. चिखली,  माँ जिजाऊ फार्मर प्रोड्युसर कंपनी देऊळगावराजा केंद्र – सिंदखेडराजा, नांदुरा अँग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी नांदुरा केंद्र- वाडी या केंद्रांना मान्यता दिलेली आहे.

  त्यानुसार जिल्हा पणन अधिकारी, बुलढाणा यांनी जिल्ह्यामध्ये उपरोक्त ठिकाणी गहू व ज्वारी खरेदी करण्याचे आदेश दिले आरहे. नाफेडची हरभरा नोंदणीस मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यामध्ये कोरोना प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यामुळे शेतकरी हरभरा विक्री करण्यासाठी आपली नोंदणी करु शकले नाही. त्यामुळे शासनाने दि. 18 जुनपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. तरी शेतकऱ्यांनी वरील संस्थाकडे नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहनही जिल्हा पणन अधिकारी यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.