टंकलेखन पदा करीता संगणकावर चाचणी परीक्षा होणार-शासन निर्णयाचे राज्य संघटनेचे सहसचिव अरूण चांडक तर्फे स्वागत
शेगांव – महाराष्टृ लोकसेवा आयोगामार्फत आयोजीत लिपीक-टंकलेख्न इंग्रजी व मराठी तसेच सहायक या टंकलेखन अर्हता आवश्यक असलेल्या टंकलेखन कौशल्य चाचणी परीक्षा घेण्याचा निर्णय जी.आर.- एमआयएस.0120/जीआर-31/2021/मा.ते दि. 16 नोव्हेंर 2021आयोगाकडून निणर्य घेण्यात आला. जी.आर. मधे असे सुध्दा म्हटले आहे की, लिपीक-टंकलेखन मराठी व इंग्रजी तसेच कर सहायक या तीन संवर्गातील पदाकरीता संगणक प्रणालीवर आधरीत स्वतंत्र चाचणी परीक्षा घेण्यात येईल. ही परीक्षा स्वतंत्र अर्हता/पात्रता स्वरूपाची असेल.
त्या करीता सेवा प्रवेश नियमातील तरतुदीनुसार टंकलेखन/संगणक-टंकलेखन इंग्रजी 40 व मराठी-30 चे प्रमाणपत्र असने जरूरीचे आहे. ही तरदुत शासनाच्या या पुढे येणा-या जाहिरातीपासून लागू होईल. या निर्णयाचे महा.राज्य टंकलेखन लघुलेखन संघटचेने सहसचिव अरूण चांडक यांनी स्वागत केले. काही संस्था चालक असे पात्र प्रमाणपत्र मोठी रक्कम घेवून परस्पर मिळवुन देत होते. त्यांना सरस्पर नोकरी मिळत होती.
परंतु या निर्णयामुळे या गोष्टीला आळा बसेल व जे विध्यार्थी नियमीत सराव करून प्रमाणपत्र धारण करेल तेच विध्यार्थी चाचणी परीक्षेत पास होवून पात्र होतील. त्यामुळे याचा फायदा निश्चित मिळेल. पालक वर्गाणी व विध्यार्थ्यांनी अवैध्य प्रमाणपत्र न मिळवता आपल्या गावातील किंवा आपल्या जवळील सरकार मान्य संस्थेमधुन प्रवेश घ्यावा. असे आव्हाहन बुलडाणा जिल्हा संगण्क टंकलेख्न संघटनेचे अध्यक्ष पुरूषेात्तम वावगे व सचिवकार्याध्यक्ष् अजय चव्हाण्, सौ. कविता शर्मा व सचिव रवीरांणा देशमुख यांनी केले.