गजानन सोनटक्के जळगाव जा – आज दि 12 रविवार भाद्रपद महिन्यातील सूर्य षष्ठीला महालक्ष्मी माता (गौरी) यांचे आगमन झाले सर्वत्र हा उत्सव साजरा होत असतो त्याप्रमाणे सूनगाव येथे 10 ते 12 भक्तांच्या घरी महालक्ष्मी मातेचे आगमन होत असते सालाबादाप्रमाणे सूनगाव येथील रामदास राठोड यांच्या घरी पिढ्यानपिढ्या चालत आलेला उत्सव यावर्षी सुद्धा मोठ्या थाटामटाने साजरा करणार आहेत
घरातील पुरुष मंडळी व मुले या महालक्ष्मी मातेच्या मंदिराला मंडप डेकोरेशन लाइटिंग करीत असतात व सुंदर अशा परदे गजरे लाईट झुंबर या साधनांनी हे मखर सुंदर असे तयार करीत असतात व सुमारे चार वाजेच्या सुमारास आज महालक्ष्मी मातेचे आगमन झाले महालक्ष्मी माता ह्या अडीच दिवसां साठी आपल्या माहेरी येत असतात अशी आख्यायिका आहे आज दुपारी चारच्या सुमारास महालक्ष्मी माता यांचे आगमन झाले त्यांना सुंदर अशा आभूषणांनी व हार फुलांनी नटविले जाते व त्यांचे रूप हे मनमोहक असते व उद्या सकाळीच महालक्ष्मी माता यांच्या महाप्रसादाला सुरुवात केल्या जाते व बारा वाजता महालक्ष्मी मातेची आरती होऊन दुपारच्या सुमारास महाप्रसादाचे वितरण केले जाते
हा दिवस म्हणजे सुनगाव करांसाठी एक महत्त्वाचा दिवस असतो व सर्वत्र गावात आनंदमय वातावरण असते व संध्याकाळी हे महालक्ष्मी मातेचे दर्शन घेण्यासाठी भाविक जात असतात व आज दुपारचा अर्धा दिवस व आणखी दोन दिवस असे अडीच दिवस महालक्ष्मी मातेचे आगमन असते हा उत्सव मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा केल्या जात असतो