रवींद्र सुरुशे – श्रीकृष्ण जन्माष्टमी च्या पर्वावर प्रतिपंढरपूर म्हणून समजल्या जाणाऱ्या देऊळगाव माळी येथील श्री पांडुरंग संस्थान येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात कोरोनाचे नियम पाळून साजरी करण्यात आली. यावेळी हरिभक्त परायण प्रकाश महाराज मगर यांनी श्रीकृष्ण जन्माचा अध्याय श्रोत्यांसमोर सांगितला. त्यानंतर रात्रीला ठीक बारा वाजता श्रीकृष्ण जन्म साजरा करण्यात आला.
यावेळी गावातील उपस्थित महिलांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा पाळणा म्हणून जन्मदिवस साजरा केला. त्यानंतर आरती म्हणून प्रसाद वाटप करण्यात आला. तसेच देऊळगाव माळी येथे घरोघरी सुद्धा बालगोपाळांनी कृष्ण राधे ची वेशभूषा करत द्वारकाधीश यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी संस्थानचे विश्वस्त मंडळी व ग्रामस्थ महिला मंडळी उपस्थित होते.