शहिद जवान स्व. कैलास कापरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित मोफत महा आरोग्य शिबीरातील 95 रुग्ण शस्त्रक्रिया व पुढील उपचारासाठी रवाना
शहिद जवान स्व. कैलास कापरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित मोफत महा आरोग्य शिबीरातील 95 रुग्ण शस्त्रक्रिया व पुढील उपचारासाठी रवाना
गजानन सोनटक्के
जळगाव जा
सुनगांव येथे दि. २४ मे रोजी शहीद जवान स्व. कैलास कापरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ तसेच महाराणा प्रताप जयंती, अहिल्याबाई होळकर जयंती व छत्रपती संभाजी महाराज जयंती च्या निमित्त भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी विभाग चे जिल्हा कार्याध्यक्ष श्री समाधान दामधर, जेष्ठ समाजसेवक शेषराव वंडाळे, प्रविण फार्मर ग्रुप व डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय जळगाव मार्फत मोफत महा आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरात हृदयरोग व जनरल मेडिसिन, हाडांचे विकार,नाक कान घसा विभाग, नेत्रविकार विभाग, सर्जरी विभाग, 2D इको व ECG व स्त्रीरोग विभाग अश्या एकूण ७ विभागाचे 700 पेक्षा अधिक रुग्णांची तपासणी व औषोधपचार करण्यात आला. यामधील 95 रुग्णांना शस्त्रक्रिया व पुढील उपचारासाठी जळगाव खान्देश येथील उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे पाठविण्यात आले.
या वेळ आयोजक समाधान दामधर यांनी सर्व रुग्णांना भेटून रवाना केले.
यावेळी
शेषराव वंडाळे, राजुभाऊ राजपूत, डॉ शालिग्राम कपले, महादेव गवई,राजेश मिसळ, दिनेश ढगे, सुनील भगत, रामशिंग राजपूत, निखिल वंडाळे, गोपाल धुळे, मारोती कोथळकर, श्रीराम मिसाळ, गणेश वसुले, सुभाष ढगे,निलेश वंडाळे, रवी नानगदे, बाळू ठोसर, गणेश भड, महादेव भगत, राहुल इंगळे, निलेश भगत, रामेश्वर केदार,सागर भोपळे, तंटामुक्ती अध्यक्ष अमोल येउल, गजानन खिरोडकर, गजानन सोनटक्के, विजय वंडाळे, ज्ञानेश्वर अंबडकार,गणेश राऊत, अमोल भगत, तसेच प्रवीण फार्मर ग्रुप चे संचालक व इतर मान्यवर उपस्थित होते.