गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनीधी:-
जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सुनगाव येथील नागरिकांना सहा ते आठ दिवसांनी पाणी मिळत आहे. परंतु तेही पाणी मुबलक प्रमाणात मिळत नसून गावातील नागरिकांना गावातील हात पंपाद्वारे काहीसा दिलासा मिळाला होता परंतु गेल्या आठ ते दहा दिवसांपासून गावातील जवळ जवळ आठ हातपंप नादुरुस्त अवस्थेत खोलून ठेवलेले आहेत. त्यातच ग्रामपंचायत प्रशासन ते हातपंप दुरुस्ती करण्याकरिता मोठा विलंब लावत असून नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. हात पंप गेल्या आठ ते दहा दिवसांपासून खोलून ठेवल्यामुळे हातपंपावर कुत्रे गुरेढोरे आपले मूत्रविसर्जन करू शकतात. त्यातच खोलून ठेवलेल्या हातपंप जवळील लहान लहान बालके त्या हात पंपाच्या पाईप मध्ये दगड सुद्धा टाकू शकतात त्यामुळे हात पंप दुरुस्त न होता नादुरुस्त च राहील. त्यामुळे गुराढोरांचे नागरिकांचे पाण्यासाठी मोठे हाल होत आहेत. त्यातच गावाला अनियमित होणारा पाणीपुरवठा त्यातच कुचकामी ठरलेली 140 गाव पाणी पुरवठा योजना त्यामुळे सुनगांव ग्रामपंचायतीने वेळीच हातपंप दुरुस्त करून नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून मुक्त करावे अशी मागणी आहे मोठ्या प्रमाणात गावातील नागरिक करीत असून, गावचे सरपंच यांनी याकडे लक्ष देऊन नागरिकांचा हा प्रश्न मार्गी लावावा. व हातपंप दुरुस्तीसाठी पंचायत समिती पाणी पुरवठा विभाग किंवा गावातील कोणत्याही कारागिराला हातपंप दुरुस्ती चा ठेका अद्याप दिलेला नाही तरी हातपंप दुरुस्ती साठी स्वतंत्र कारागीर ठेवावे अशी मागणी सूनगाव येथे होत आहे