एक महिना उलटून गेल्यानंतरही दिला नाही पदभार
गावाचा विकास खुंटल्याचा नागरिकांचा आरोप
गजानन सोनटक्के जळगाव जा
जळगाव जामोद तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या सुनगाव येथील ग्रामसेवक खोद्रे यांची बदली होऊन महिना उलटून गेला आहे तरी हेतुपुरस्सर द्वेष भावनेने व भ्रष्टाचार करण्याच्या उद्देशाने त्यांनी सुनगांव ग्रामपंचायत चा अधुरा पदभार ग्रामसेवक जोशी यांना दीला आहे आणि ज्या पदभारामध्ये मध्ये पैशाची मोठी उलाढाल होते आहे त्या विषयाचा पदभार म्हणजे 15 वा वित्त आयोगाचा सर्व नियम धाब्यावर ठेऊन खोद्रे यांनी नविन ग्रामसेवक श्री जोशी साहेब यांना पदभार दीला नाही.यामुळे ग्रामसेवक खोद्रे यांनी आमच्या सुनगावचा विकास खुंटवला आहे .तसेच लेंडी नदीवर पूलाचे अंदाज पत्रक हे जनतेच्या ये जा करण्यासाठी अडचणी निर्माण होऊ नये म्हणून सदरचे अंदाज पत्रक बणवले आहे मात्र जे ई श्री काळपांडे यांनी सदरच्या पुलाचे बांधकाम अंदाज पत्रका प्रमाणे करून घेतले नाही.म्हणुन यांच्या वर ताबडतोब कडक कारवाई करावी. तसेच दि.24/01/2023 ला बदलुन गेलेले ग्रामसेवक श्री खोद्रे यांच्या सहीने सुनगाव ग्रामपंचायत अंतर्गत कोणत्याही कामाचे देयके अदा करण्यात येऊ नये.कारण सुनगांव ग्रामपंचायत चे रितसर ग्रामसेवक/ग्राम विकास अधिकारी श्री जोशी साहेब हे वरिष्ठांचे लेखी आदेशा नुसार कामकाज पाहत आहेत, जोशी ह्यांना सुनगांव ग्रामपंचायत ला रुजू होऊन महिना उलटून गेला आहे तरी हेतुपुरस्सर द्वेष भावनेने भ्रष्टाचार करण्याच्या उद्देशाने श्री खोद्रे ग्रामसेवक यांनी 15 वा वित्त आयोग निधी चा पदभार न दिल्याने विविध समस्या निर्माण झाल्या आहेत करिता ग्रामसेवक खोद्रे यांच्या वर ताबडतोब कारवाई करावी, तसेच काळपांडे यांनी सदरच्या पुलाचे बांधकाम अंदाज पत्रका प्रमाणे करून घेतले नाही याला जबाबदार असणारे अभियंता काळपांडे व ग्रामसेवक खोद्रे यांच्या वर ताबडतोब कारणे दाखवा नोटीस पाठऊन कारवाई करावी . अशी मागणी तक्रार कर्त्यांनी गटविकास अधिकारी यांना केली आहे या तक्रारींवर विजय वंडाळे व गजानन धुळे यांच्या सह्या आहेत व या खात्याचा पदभार न देण्याचे रहस्य काय असेल अशी चर्चा सुनगाव येथील नागरिकांत होत आहे