शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर आज वरवट बकाल येथे स्वाभिमानीचे रास्तारोको.
शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी राजु शेट्टी यांनी राज्यभर पुकारलेल्या चक्काजाम आंदोलनात बहुसंख्यने उपस्थित रहा.
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर आज वरवट बकाल येथे स्वाभिमानीचे रास्तारोको.
शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी राजु शेट्टी यांनी राज्यभर पुकारलेल्या चक्काजाम आंदोलनात बहुसंख्यने उपस्थित रहा.
गजानन सोनटक्के
जळगाव जा
राज्यसरकारने जाणीवपूर्वक शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे भाव पाडले असल्याने २२ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १० वाजता वरवट बकाल येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या उपस्थित रास्तारोको आंदोलन होणार आहे. कापुस-सोयाबिन भाव वाढ, बोंडअळी मुक्त कपाशी बियाणे, शेतमजुरांसाठी स्वतंत्र शेतमजूर कल्याण महामंडळ, रखडलेली अतिवृष्टीची नुकसान भरपाई, विमा कंपनिने रोखलेला पिक-विमा,कृषी पंपाला दिवसाला विज व कृषी कनेक्शनवर वाढलेला लोड समतोलसाठी नविन डि पी वाढविणे, उसाला एकरकमी एफआरपी, प्रोत्साहनपर अनुदानाची थकित रक्कम,नाफेड मार्फत शासकीय कांदा खरेदी सुरू करावी, लंपीआजाराने मृत्यु झालेल्या पशु मालकांना भरपाई द्यावी व बुलढाणा येथे आंदोलक शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी इत्यादी मागण्यांसाठी राज्यातील शेतकरी रस्त्यावर उतरणार आहेत.