सुनगाव ग्रामपंचायत ने अंदाजपत्रक धाब्यावर ठेवून केले पुलाचे काम
गजानन सोनटक्के जळगाव जा
जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव ग्रामपंचायत ने पुलाचे काम हे अंदाजपत्रकानुसार न करता मनमानी कारभारामुळे केलेले आहे सदर वार्ड क्रमांक चार मधील गोरक्षनाथ मंदिराकडे जाण्याच्या नाल्यावर सदर पुलाचे बांधकाम करण्यात आले या पुलाचे बांधकाम हे पाच लाख रुपये किमतीचे अंदाजपत्रकानुसार ठरविण्यात आले असून त्यामध्ये पुलाची रुंदी ही 7.50 मीटर म्हणजेच 24 फूट रुंद असायला हवी त्यामध्ये रुंदी मध्ये तीन पाईप टाकायला हवे होते व त्या पाईपला जॉइंड कपल न टाकताच पुलामध्ये दोन आठ आठ फुटाचे दोन सिमेंट पाईप टाकण्यात आले व पुलाची रुंदी ही अंदाजपत्रकानुसार 24 फूट असताना सदर पुलाचे बांधकाम हे अंदाजपत्रक लक्षात न घेता पंधरा ते सोळा फूट बांधकाम करण्यात आले यावरून अंदाजपत्रकाला फाटा देत सदर पुलाचे बांधकाम हे ग्रामपंचायतीने केले आहे व या पुलाचे बांधकाम हे तातडीनेच दोन तीन दिवसात पूर्ण करण्यात आले अंदाजपत्रकानुसार पुलाचे कोणतेच काम करण्यात आले नाही त्यामुळे अंदाजपत्रकानुसार केलेल्या कामाचे जीवन मर्यादा ही भरपूर राहू शकते व अंदाजपत्रकानुसार फुलाचे काम झाले नाही व त्यामध्ये वापरलेल्या सिमेंट पाईप व इतर साहित्याचे ग्रामपंचायतीने कोणत्याच प्रकारचे ई टेंडरिंग केलेले नाही व संबंधित पंचायत समिती अभियंता हे या कामावर तळ ठोकून उभे असताना त्यांनी इस्टिमेट हे लक्षात न घेता फुलाचे बांधकाम कसे काय केले सदर रस्ता हा रहदारीचा असून या पुलाचे बांधकाम हे आतील 13 फूट रुंद व बाहेरील बाजूस 16 फूट रुंद झालेले आहे त्यामुळे या पुलावरून एका वेळेस दोन वाहने निघू शकत नाहीत व अंदाजपत्रकात 24 फूट बांधकाम असताना पुलाचे बांधकाम हे 13 ते 15 फूट कसे काय करण्यात आले यामध्ये संबंधित अभियंता व ग्रामपंचायत सुनगाव यांनी अंदाजपत्रकाला फाटा देत सदर पुलाचे बांधकाम केले आहे व या फुलाचे बांधकाम हे अंदाज पत्रका नुसार रुंद म्हणजे 24 फूट न केल्याने या पुलावरून रहदारीस अडथळा निर्माण होत आहे तरी या असल्या मनमानी कारभाराची पंचायत समिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व बांधकाम विभाग यांनी या पुलाच्या कामाची चौकशी करून कामे ही अंदाजपत्रका नुसारच व्हायला हवी