दलित वस्ती निधी गैरवापर प्रकरनी बांधकाम अभियंता पंचायत समिती। यांचेकडून चौकशी
गटविकास अधिकारी यांना तक्रार
जळगांव जा.प्रतिनिधी:-
जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील गट ग्रामपंचायत विविध कारणांमुळे नेहमी चर्चेत असते, सुनगाव ग्रामपंचायत ने लहुजी साळवे दलित वस्तीतील रस्त्याचा निधी दलित वस्तीत न करता त्या निधीचा सर्रास वापर सवर्ण जातीच्या वस्तीमध्ये केला आहे. तसेच बनावट व दिशाभूल करणारे दस्तऐवज तयार करून ग्रामपंचायतीने दलित वस्तीचा विकास निधीचा अपहार केल्याची तक्रार सुनगाव ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य यांनी कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद तहसीलदार जळगाव जामोद व गटविकास अधिकारी पंचायत समिती जळगाव जामोद यांना दिली आहे. लहुजी साळवे दलित वस्ती विकास निधी मधून पाच लक्ष मंजूर झालेले असताना ते काम सुद्धा दलित वस्तीत न करता जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळे समोरील रस्ता ते डांबर रोड पर्यंतचा रस्ता सवर्ण वस्तीत केल्या गेला हा सर्रास पणे दलित बांधवांवर अन्याय असून संबंधित अधिकारी व पदाधिकारी ग्रामपंचायतीच्या संगनमताने दृश्य भावनेने दलित वस्तीचा विकास थांबविण्यासाठी दलित वस्ती विकास निधीचा गैरवापर केला हा कायद्यानुसार गुन्हा असून या सर्व गोष्टी वेळोवेळी संबंधित अधिकारी व पदाधिकारी यांच्या लक्षात आणून देण्याकरिता माजी ग्रामपंचायत सदस्य यांनी प्रयत्न केले असता ते व्यर्थ ठरले. तसेच चुकीचे अंदाजपत्रक बनविणे व चुकीची माहिती देणे तसेच लहुजी साळवे दलित वस्तीचा विकास निधीचा वापर दलित वस्ती मध्ये ला करता सवर्ण वस्तीचा विकास म्हणून संबंधित अधिकारी पदाधिकारी यांच्यावर कारवाई करून सुनगाव येथील दलित बांधवांना न्याय मिळावा अशी तक्रार पांडुरंग गवइ यांनी केले होती त्यानुसार 21 एप्रिल 2023 रोजी पंचायत समीती बांधकाम अभियंता काळपांडे यांनी सदर रोडची चौकशी केली व आज दिनांक 24 4 2023 रोजी तक्रार करते पांडुरंग गवई यांनी गटविकास अधिकारी यांना तक्रार केली आहे की माझ्या तक्रारीचे निरसन झाल्याशिवाय सदर कामाचे देयके अदा करू नये व तसे केल्यास आपणा संबंधित पोलीस स्टेशन जळगाव जामोद येथे ॲट्रॉसिटी कायद्याप्रमाणे तक्रार दिली जाईल व गुन्हे दाखल करण्याची मागणी केली जाईल
