पावसासहित सोसाट्याच्या वाऱ्याने सूनगाव परिसरात पिकांचे नुकसान
जळगांव जा दि 11:दिनांक 10 सप्टेंबर रोजी तालुक्यातील सूनगाव परिसरात संध्याकाळी 7च्या सुमारास सोसाट्याचा वारा व पावसाला सुरुवात झाली हा सोसाट्याचा वारा व पाऊस जवळपास दीड ते दोन घंटे सुनगाव परिसरात राहिला त्यामुळे शेतकऱ्यांचे फळबाग ,मक्का, कपाशी तसेच इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे संध्याकाळी सातच्या सुमारास परिसरात अचानक पावसाला सुरुवात झाली त्यातच सोसाट्याच्या वाऱ्यासह मेघ गर्जना सह विजांचा कडकडाट सुरू झाला. या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेले सोयाबीन कपाशी,मका, उडीद ,भाजीपाला तसेच मोठी मेहनत करून शेतकऱ्यांनी लावलेले संत्रा ,इतरफळबाग यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे काही झाडांची फळे खाली पडले तर कुठे कुठे संत्रा झाडे सोसाट्याच्या वाऱ्याने जमीनदोस्त करून टाकलेले आहेत त्यामुळे या आसमानी संकटाने शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेने हिरावून घेतलेला आहे तरी महसूल व कृषी विभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा पिकांचा सर्वे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे त्यानुसार आज भर पावसामध्ये तालुका कृषी अधिकारी धीरज वाकोडे यांनी शेताची पाहणी करून व पिकाचे झालेले नुकसान स्वतः प्रत्यक्ष पाहून चौकशी शेतकऱ्याकडून करून घेतले यावेळी सामाजिक कार्यकर्ते समाधान दामधर माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास बोडखे तसेच सुनील भगत हे होते त्यानुसार शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांना मदतीची मागणी केली