सुनगाव ग्रामपंचायत अंतर्गत दलित वस्तीच्या सिमेंट रस्त्याचे अंदाजपत्रक चुकीचे
माजी ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग गवई यांचा आरोप
सुनगाव ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या वार्ड क्रं 1 सुनगांव एकनाथ गवई ते धम्मपाल शिरसाट यांचे घराजवळ दलित वस्ती विकास निधीतून सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे सदर ठिकाणी चालू असलेल्या कामाचे अंदाजपत्रक चुकीचे आहे मात्र या ठिकाणी काळ्या मातीचे मळ्यात प्लॉट पडलेले आहेत आणि या ठिकाणी या अगोदर कुठल्याही प्रकारचे रस्ता खडीकरण किंवा कोणत्याही प्रकारे रस्ता पक्की कर्णाचे काम ग्रामपंचायत सुनगांव ने केलेले नाही.त्यामुळे पावसाळ्यात पाऊस आल्यानंतर ही काळी माती भिजुन जाईल व रस्ता दबुन त्याचा एक, दोन वर्षे तच रस्ता उखडून जाईल. पाच लाख रुपये खर्च करून त्याचा काहीच उपयोग होणार नाही.आणि म्हणून अंदाज पत्रक तयार करत असताना बेस फोंडीशन तयार नसतांना जे ई ने सदर अंदाज पत्रक तयार करण्यात मोठी दीरंगाई केल्यामुळे सदर दलित वस्ती विकास निधीचा दुर उपयोग करण्याचा प्रयत्न केला आहे व सदर अंदाज पत्रक तयार केले आहे.आणि याअगोदर सुनगांव ग्रामपंचायत अंतर्गत दलीत वस्ती विकास निधीतून सिमेंट रस्त्याचे काम करत असताना बेस फोंडीशन तयार करुनच कामे करण्यात आलेले आहेत.आणि म्हणून आपण स्वतःहा प्रत्येक्ष पाहाणी करुन अंदाज पत्रक दुरुस्ती करून पुढील काम करण्यात यावे.जेनेकरुन रस्ता उखडून जाणार नाही.व हे काम मजबूत होईल आणि सदर निधीचा दुर उपयोग होणार नाही.तसेच हेतुपुरस्सर दुर्लक्ष करून दीशाभुल करणारे अंदाज पत्रक तयार करण्यात आलेल्या.जेनेकरुन भविष्यात कोणतेही बांधकाम काम हे दर्जेदार व गुणवत्तेचे होईल आणि निधीचा सुद्धा गैरवापर होणार नाही .