शॉर्टसर्किटमुळे आग लागून सुनगाव येथील शेतकऱ्याचे 1 लाख 37 हजार रुपयाचे नुकसान
गजानन सोनटक्के
जळगांव दि 8:सूनगाव शिवारात मंगळवार दिनांक 7 जून रोजी दुपारी एकच्या सुमारास शेतकरी प्रल्हाद लक्ष्मण मिसाळ व उखर्डा लक्ष्मण मिसाळ यांच्या शेतातील जनावरांच्या गोठयाला शॉर्टसर्किटमुळे आग लागून जवळपास 1 लाख 37 हजार रुपयाचे शेती साहित्य आगीत भस्मसात झाले आहे या आगीमध्ये ठिबक संच किंमत 90 हजार रुपये,बांबू 200 नग किंमत 35 हजार रुपये ,जनावरांचे खाण्याचे कुटार 3 गोणे किंमत 12हजार रुपये असे दोन्ही भावांचे शेती साहित्य आगीत भस्मसात झाले आग लागल्याचे लक्षात येताच शेजारील शेतकऱ्यांनी ती विझवण्याचा प्रयत्न केला परंतु आगीने उग्र रूप धारण केल्यामुळे जळगाव जामोद नगरपालिकेतील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले त्यांच्या प्रयत्नांना यश आले त्यामुळे आग पुढे जाऊ शकली नाही आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी सूनगाव बीटचे पोलीस हेडकॉन्स्टेबल सुशिर गावचे तलाठी हजर होऊन त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला झालेल्या नुकसानीची मदत शेतकऱ्यांना मिळावी अशी शेतकऱ्यांनी मागणी केलेली आहे