स्वाभिमानी चे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या सह शेकडो कार्यकर्त्यांनी पहाटे जळगाव-शेगाव मार्ग रोखला…
रस्त्यावर टायर पेटवून स्वाभिमानी चा चक्का जाम
गजानन सोनटक्के जळगाव जा
शेतकऱ्यांना दिवसाला १० तास वीज द्या या मागणी साठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांनी उपोषण सुरू केलेले आहे. त्यात सरकारने आंदोलनाची दखल घेतली नसल्याने राज्यभर चक्का जाम आंदोलन करणार असल्याची घोषणा राजु शेट्टी यांनी करताच बुलडाणा जिल्ह्यात त्याचे पडसाद पाहवयास मिळाले.
आज रात्री पासूनच स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी जळगाव-शेगाव मार्गावरील चागेंफळ फाट्या जवळ टायर पेटवून चक्का जमा आंदोलन सुरू केले आहे. जो पर्यंत शेतकऱ्यांचा वीजेचा प्रश्न सुटत नाही, शेतकऱ्यांना दिवसा १० तास वीज मिळत नाही तो पर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा स्वाभिमानीने घेतला आहे. अचानक पणे जळगाव-शेगाव रस्त्यावर टायरे पेटवून स्वाभिमानीने आंदोलन सुरू केल्याने एकच खळबळ माजली आहे.