![](https://www.matrutirthalive.com/wp-content/uploads/2022/04/IMG-20220413-WA0037.jpg)
गजाननसोनटक्के
जळगाव जामोद तालुक्यातील सूनगाव ग्रामपंचायत कडून सात (गुजरी) ही नियमाला अनुसरून केल्या जात नाही सुनगाव येथीलहार्डवेअर व शेतीला पूरक व्यवसाय म्हणून काही शेतकऱ्यांनी पोल्ट्री फार्म शेतात टाकले आहेत या पोल्ट्री फार्मला येणारे पक्षी खाद्य हे मोठ्या ट्रक मध्ये येते व ते गावा बाहेरच ट्रक उभे करून ट्रॅक्टरद्वारे हे शेतकरी आपल्या शेतामध्ये हे पक्षी खाद्य नेत असतात परंतु ग्रामपंचायतीने हर्रासी केलेल्या ठेकेदार हा त्यांना सुद्धा शंभर ते दीडशे रुपये पावतीची सक्ती करत होता व हार्डवेअर दुकानदार यांच्याकडे कंपनी प्रतिनिधी सॅमपल घेऊन फोरविलर ने व लोखंड सिमेंट ट्रकमध्ये येत असता व त्या दुकानावरून बाहेर गावातील लोक साहित्य नेत असता त्यांनासुद्धा कराची पावती ठेकेदार करीत असतो वास्तविक पाहता गावाबाहेर ग्रामपंचायतीचा कोणताच कर पडत नसतो तरीसुद्धा असा हा अनुचित प्रकार ग्रामपंचायत व संबंधित ठेकेदार यांच्याकडून घडत असतो तरी यापुढे आम्ही असा कोणत्याही प्रकारचा कर देणार नाही होणाऱ्या वादातून गाव ग्रामपंचायत जबाबदार राहणार अशी तक्रार ग्रामपंचायत सुनगाव ला या व्यवसायिकांनी काल 11 एप्रिल रोजी ग्रामपंचायतला केली आहे सुनगाव ग्रामपंचायतीने हराशी केलेली सात व त्याचा कर हा सूनगाव ग्रामस्थांना व बाहेरून साहित्य आणताना नाहक त्रास सहन करावा लागतो तरी यापुढे सुनगाव ग्रामपंचायतीने हा कर माफ करावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे