Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

गावातील छोटे व्यवसायिक व फेरीवाले यांची ग्रामपंचायतला तक्रार

Gajanan sontakke

गजानन सोनटक्के जळगाव जा

सूनगाव ग्रामपंचायत कडून दर वर्षी बाजार व गुजरी हराशी केल्या जाते सात हराशी ही नियमाला अनुसरून केल्या जात नाही व ठेकेदार अव्वाच्या सव्वा कर वसुली करतो व कर वसुलीची पावती देत नाही व सात ठरवून दिलेल्या क्षेत्रातच दुकाने असणाऱ्यांना कर पडावा व त्या व्यतिरिक्त गावातील काही मोजक्याच फेरीवाले व रेगडीवर छोटे व्यवसाय करणाऱ्यांना संबंधित ठेकेदार हा कराची सक्ती करतो परंतु जर सर्वांना कर पडत असेल तर गावातील दही दूध भाजीपाला डोक्यावर विकणार्‍यांना व गावातील RO प्लांट वाले गावात पाणी विकतात व गावातील ट्रॅक्टर वाहने बाहेरून मालआणतात त्यांना का कर पडत नाही व छोट्या व्यावसायिकांना कर पडतो असा भेदभाव का केला जातो व सर्वांना जर कर पडत असेल तर आम्ही कर देण्यास तयार आहे नियम सर्वांनाच लागू पडतो मग आमच्यासाठी का असा भेदभाव ग्रामपंचायत मध्ये होतो व संबंधित ठेकेदार याला यापुढे आम्ही कर देणार नाही व होणाऱ्या वादास ग्रामपंचायत जबाबदार राहणार अशा स्वरूपाची तक्रार सुनगाव येथील छोटे व्यवसायिक व फेरीवाले यांनी ग्रामपंचायतला 10 / 3 20 22 रोजी तक्रार केली आहे या तक्रारींवर रमेश पाटील मनोहर वानखडे प्रकाश ताडे किसन घोपे दिनेश घोपे गजानन नटकूट शेख मुसताक गजानन नानगदे यांच्या सह्या आहेत व आमच्या अर्जाचा विचार करावा अशी मागणी या व्यवसायकांनी केली आहे

Leave A Reply

Your email address will not be published.