पाणीपुरवठा ठप्प
गजानन सोनटक्के
जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असून या ठिकाणी पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन नेहमीनेहमी फुटत असून यामुळे ग्रामपंचायत प्रशासन सूनगाव वासियांना पाणीपुरवठा करण्यास असमर्थ ठरत आहे. आज सात ते आठ दिवस होऊनही पाईपलाईन फुटलेल्या अवस्थेतच आहे
पाईपलाईनचे सुटे भाग वॉल मिळत नाही व मिळाले तर ते अकोला मिळतात अशा स्वरूपाची कारणे सांगितली जातात व फुटलेली पाईपलाईन तशीच पडून राहते परंतु ग्रामपंचायत कडून पाणीपुरवठा कर्मचारी व पाणीपुरवठा योजनेचा योग्य नियोजन लावलेले दिसत नाही तरी उन्हाळ्यात मार्च महिना लागताच ही परिस्थिती आहे तर पुढे कशी परिस्थीती येणार हे देव जाणे व गावात महाजल योजना पाणीपुरवठा योजना व 140 गाव पाणीपुरवठा अशा तीन पाणी पुरवठा योजना कार्यरत असताना सुद्धा सूनगवासीयांचे पाण्यासाठी मोठे हाल होत आहे हे मात्र शोकांतिका आहे तरी पुढाऱ्यांनी व ग्रामपंचायतीने या पाणीपुरवठा योजना व पाणीपुरवठा कर्मचारी यांचे योग्य नियोजन करून सुनगाव ग्रामस्थांना नियमित पाणीपुरवठा करावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे