सुनगाव येथील पांदण रस्त्याची झाली दुर्दशा
शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे कमालीचा त्रास
गजानन सोनटक्के जळगाव जामोद
सूनगाव येथील भाग दोन मधील अवजसिद्ध महाराज मंदिर मागील शेत रस्ता हा 2021 मध्ये जिल्हा परिषद फंडातून पानंद रस्ता योजनेअंतर्गत मंजूर झाला होता त्या दृष्टीने शेतकऱ्यांना येण्या जाण्याकरिता हा रस्ता तयार केला होता रस्त्याच्या दोन्ही बाजूला जेसीबीने नाल्या खोदून शेतातून हा रस्ता टाकण्यात आला होता व या रस्त्यावर बाजूची माती टाकण्यात आली होती परंतु शेत रस्ता अर्धवट झाला व त्यावर खडीकरण मुरूम किंवा कोणत्या प्रकारचे मटेरियल टाकण्यात आले नाही व त्याला आज दीड ते दोन वर्ष होऊनही रस्त्यावर मुरूम टाकल्या जात नाही तरी शेतकऱ्यांना या हंगामात कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे यावर्षी पाऊस झाल्यामुळे या रस्त्याने भरपूर प्रमाणात गारा झाला आहे व शेतकऱ्यांच्या बैलगाडी किंवा आपली वाहने शेतात नेता येत नाही आता तर हंगाम सुरू असताना कापूस वेचणी व सोयाबीन काढणी आले असताना शेतातील माल कसा आणावा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे व काल या रस्त्यावर काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील माल आणण्याकरिता ट्रॅक्टर व बैलगाडी नेले असता ट्रॅक्टर सुद्धा या रस्त्यात फसले परिणामी त्या ट्रॅक्टरला काढण्यासाठी जेसीबी बोलावल्या गेली परंतु जेसीबी सुद्धा या रस्त्यात फसलेली आहे म्हणजे या रस्त्याची दुर्दशा किती झाली आहे तरी या रस्त्याने शेतकऱ्यांना ये जा करता येत नाही गुरांचे पाय असतात परिणामी ते मोडल्या जातात अशा या परिस्थितीत येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार जळगाव जामोद यांना आज निवेदन देऊन रस्त्याचे काम न झाल्यास उपोषणाचा इशारा येथील शेतकऱ्यांनी दिला आहे व या रस्त्यामध्ये फंडाचे काय झाले व कसे झाले याची चौकशी करावी व कोणत्याही परिस्थितीत आम्हाला रस्ता करून द्यावा व परिणामी आमच्या शेतातील मालाचे नुकसान झाल्यास शासन याला जबाबदार राहील रस्ता न झाल्यास उपोषणाचा इशारा येथील शेतकऱ्यांनी दिला आहे या निवेदनावर रवी धुळे विनोद इंगळे अतुल गिरे आणि वीस ते पंचवीस शेतकऱ्यांच्या सह्या आहेत