अखेर बँक व्यवस्थापक नरमले शेतकऱ्याच्या प्रयत्नांना यश
गजानन सोनटक्के
जळगाव जामोद
तालुक्यातील सुनगाव येथील शेतकरी रमेश किसन कोथळकर यांचे जामोद येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा जामोद मध्ये खाते असून ते दिनांक 20 एप्रिल रोजी साडे बारा वाजताच्या सुमारास आपल्या सेविंग खात्यामधून पी एम किसान निधी चे पैसे काढण्याकरिता गेले असता त्यांनी विड्रॉल भरून दिला तेव्हा विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापक राजेंद्र पाटील यांनी अल्पभूधारक शेतकरी रमेश किसान कोथळकार यांना सांगितले की तुम्हाला मी सेविंग खात्यातील पैसे देऊ शकत नाही. तुम्ही अगोदर कर्ज भरा नाहीतर तुमचे सेविंग मधील रुपये शेती कर्जा जमा करतो व तुमच्याच्याने माझे जे होईल ते करा असे सांगून त्यांना अपमानित केले.
सदर शेतकरी शेती कर्जाच्या कर्जमाफ इस करिता शासनाच्या नियमानुसार पात्र असून बँक व्यवस्थापकाने शासनाला चुकीची माहिती पुरवल्यामुळे त्याला कर्जमाफी मिळाली नाही तो कर्जमाफी पासून वंचित आहे व आज रोजी त्याला नवीन कर्ज सुद्धा मिळत नाही सदर शेतकरी अल्पभूधारक असून त्याला लागणाऱ्या शेतीच्या मशागतीसाठी पी एम किसान योजनेच्या माध्यमातून बचत खात्यात जमा झालेल्या पैशांची व नवीन कर्जाची सक्त आवश्यकता आहे. कर्जमाफी करिता बँकेला याआधी दिनांक 10/8/2020 ला कर्जमाफी करिता विनंती अर्ज केलेला आहे परंतु हाच पावतो त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही तरी याची सखोल चौकशी करून या योजनेचा लाभ देण्यात यावे असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा जामोद चे व्यवस्थापक पाटील यांच्या मुजोरी पणामुळे अल्पभूधारक शेतकरी असलेले रमेश कोथळकार यांना जगावे की मरावे हे सुचत नसून त्यातच त्यांच्या मुलांचे शिक्षण घर खर्च शेती यासह दवाखाना इत्यादी सर्व खर्च झेपावा तरी कसा? हा प्रश्न आ वासून उभा आहे. त्यांनी या त्रासाला कंटाळून दिनांक 22 एप्रिल रोजी बँक व्यवस्थापकाच्या मुजोरी विरोधात उपविभागीय अधिकारी तहसीलदार साहेब पोलीस स्टेशन या सर्वांना तक्रार दिली असून त्या तक्रारी मध्ये न्याय न मिळाल्यास दिनांक 2/5/ 2022 सोमवारला आत्मदहन करेल असा निर्णय घेतला असून प्रशासनाने योग्य तो न्याय त्यांना द्यावा अशी चर्चा गावांमध्ये सुरू असून जामोद येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक यांच्यावर योग्य ती कार्यवाही करून त्यांना कोणालाही अशी वागणूक देऊ नये अशी तंबी देण्यात यावी. अशा आशयाची तक्रार येथील शेतकऱ्यांनी दिली असताना सर्व मीडिया मार्फत त्यांच्या तक्रारीची दखल घेतल्या गेली व त्यानुसार आज दिनांक 29 एप्रिल रोजी शेतकऱ्याला नवीन पीक कर्जाचा लाभ देण्यात आला व त्याला त्याच्या बचत खात्यातील पी एम किसान चे पैसे सुद्धा देण्यात आले व त्यांच्या पत्नीला बचत गटात सामावून घेण्यास बँक तयार झाली शेवटी शेतकऱ्याच्या प्रयत्नांना यश आले व बँकव्यवस्थापक नरमले असे म्हणणे वावगे ठरणार नाही